Friday, January 3, 2025

डॉ.अंजुम पटेल यांना संगणकशास्त्रात पीएचडी पदवी प्रदान

Share

पुणे : बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वकर्मा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.अंजुम पटेल (Dr. Anjum Patel) यांनी संगणकशास्त्र या विषयात विश्वकर्मा विद्यापिठातून विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी (PHD) संपादन केली आहे. “अ प्रिडीक्टिव मॉडेल टु अँनालाईज मॉलेस्टेशन अगेन्स वुमेन्स अँड मायनर्स टु प्रेसेंट सिक्युरिटी मेजर्स फॉर सेफ फ्युचर” असा त्यांचा महत्त्वपूर्ण संशोधन विषय होता.

डॉ.पूजा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त भरत अगरवाल, विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ जबडे, आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. संजेश पवळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी त्यांना सन्मानित करत विशेष प्रशंसा केली. या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील सहकारी, मान्यवर, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

अन्य लेख

संबंधित लेख