Monday, October 28, 2024

कणखर बाणा.. हाती भगवा..

Share

कणखर बाणा.. हाती भगवा..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्रातील निवडणूकीची रणधुमाळी (Maharashtra Assembly Election) अंतिम टप्प्यात आहे, अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोपरी – पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला. ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आज संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी येऊन मला शुभाशीर्वाद दिले.

यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक मुख्यमंत्र्यांचे वडील वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, सून सौ. वृषाली शिंदे, नातू रुद्रांश तसेच हेदेखील उपस्थित होते.

शिंदे यांमी अर्ज दाखल करण्यापूर्वी आज ठाण्यातील आनंदआश्रमात जाऊन हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या विचारांवर चालणारे सरकारची दोन वर्षे यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने या राज्यात महायुतीचे सरकार नक्की येईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यानंतर वागळे इस्टेट येथील दत्त मंदिरात जाऊन श्री दत्त गुरूंचे आशीर्वाद घेतले.

अन्य लेख

संबंधित लेख