Friday, July 4, 2025

‘मराठीसाठी लढायचे असेल तर मोहम्मद अली रोडवर जा, दाढीवाल्यांना सांगा!; नितेश राणे कडाडले

Share

ठाणे : ठाण्यातील भाईंदर परिसरात मराठीत (Marathi) बोलण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका फूड स्टॉल मालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा भाजप (BJP) नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, “हे लोक फक्त गरीब हिंदूंवरच का दादागिरी करतात? मराठीसाठी खरोखर लढायचे असेल, तर नळ बाजार, मोहम्मद अली रोड, मालवणी यांसारख्या भागात जाऊन तिथल्या लोकांना मराठीत बोलायला सांगा. जावेद अख्तर, आमिर खान किंवा दाढीवाले, गोल टोपी घालणारे लोक मराठी बोलतात का? त्यांच्यावर कुणी काही बोलत नाही,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.

राणे यांनी पुढे स्पष्ट इशारा दिला, “हे हिंदुत्ववादी सरकार आहे. भाषेच्या नावाखाली कोणीही मारहाण केली, तर सरकार कठोर कारवाई करेल. अशा प्रकारांना सरकार कदापि पाठिंबा देणार नाही.

“ही घटना मंगळवारी भाईंदर परिसरात घडली. व्हायरल व्हिडिओमध्ये काही व्यक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गमछे घालून फूड स्टॉल मालकाला मारहाण करताना दिसत आहेत. या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

अन्य लेख

संबंधित लेख