Tuesday, November 18, 2025

भायखळा निवडणुकीत ‘डॅडींचा’ वारसा; योगिता गवळी प्रभाग २०७ मधून मैदानात!

Share

मुंबई महापालिका निवडणूक : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीच्या आरक्षण सोडतीमुळे भायखळा प्रभागातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. भायखळ्याच्या विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी योगिता अरुण गवळी (Yogita Gawli) यांनी प्रभाग क्रमांक २०७ मधून इच्छुक उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.

‘डॅडींचा वारसा, सेवेचा अजेंडा’

योगिता गवळी यांनी आपल्या घोषणेदरम्यान अत्यंत भावनिक आवाहन केले आहे. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत भायखळ्याच्या जनतेने ‘डॅडी’ (अरुण गवळी) यांच्यावर जे प्रेम आणि मतदानरूपी आशीर्वाद दिले, त्याच आशीर्वादाची आता पुनरावृत्ती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

“डॅडींनी जनतेची जी कामे केली आणि सेवा केली, तोच अजेंडा मी पुढे घेऊन जनतेची सेवा करण्याचा वारसा जपणार आहे. मी एक उमेदवार म्हणून नाही, तर आपल्या भायखळ्याच्या प्रत्येक घरातील सदस्य म्हणून मला आपले काम करायचे आहे.”

नगरसेवक पद नव्हे, जबाबदारी!

योगिता गवळी यांनी स्पष्ट केले की, त्या नगरसेवक पदाकडे केवळ एक ‘पद’ म्हणून पाहत नाहीत, तर ती “एक मोठी जबाबदारी” म्हणून स्वीकारण्यास तयार आहेत. “राजकारण न करता ‘समाजकारण’ करण्याचा हा आमच्या परिवाराचा नेहमीच कल राहिला आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

“मला आपली सेवा करण्याची एक संधी द्याल,” अशी आशा योगिता गवळी यांनी भायखळावासीयांसमोर व्यक्त केली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख