Tuesday, September 17, 2024

कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार…महाराष्ट्र मानकरी

Share

केंद्रिय कृषी मंत्रालयाच्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारा यंदाचा कृषी पायाभूत निधी सर्वोत्कृष्टता पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. तसंच २०२२-२३ या वर्षासाठी राज्याला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. नवी दिल्लीत काल झालेल्या समारंभात केंद्रिय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जावर वार्षिक ३ टक्के सवलत दिली जाते. या योजनेसाठी राज्यात गेल्या ऑगस्ट महिन्यापर्यंत विविध बँकांनी ८ हजार ३ शे ५३ प्रकल्पांसाठी ६ हजार १ शे १७ कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगानं सर्व राज्यांमधल्या कृषी पायाभूत सुविधा निधीचा लाभ घेऊन उभारलेल्या प्रकल्पांमधल्या उत्पादनांचे स्टॉल लावण्यात आले होते.

अन्य लेख

संबंधित लेख