Saturday, December 28, 2024

मानखुर्द येथे होणार भव्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन

Share

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi Holkar) यांचा आज स्मृतिदिनानिमित्त राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील मानखुर्द येथे भव्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन बांधण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारतर्फे ही घोषणा कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी केली आहे.

साधारणपणे ३५,५०० स्वेअर मीटर परिसरात हे भवन उभारलं जाईल. त्यासाठी ४७ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून “अहिल्या भवन” उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे भवन बनणार असून त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभा राहिल. महिलांसाठी समुपदेशन केंद्र असणार आहे. याशिवाय २०० पेक्षा जास्त लोकांसाठी सभागृह आणि विश्रामगृह उभारण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील सर्व महिला बाल विकासासंदर्भातील सर्व कार्यालये एका छताखाली येणार आहेत. सर्व सुविधांनी युक्त आणि भव्य असे स्मृतीभवन पहिल्यांदाच भारतात उभे राहणार आहे, अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढांनी दिली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख