सातारा : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय (Chhatrapati Shivaji Maharaj Museum) येथे शिवशस्त्रशौर्यगाथा अंतर्गत व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथून आणलेल्या शिवछत्रपती यांच्या वाघनखांसह (WaghNakh) शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते झाले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे उद्घाटनही कोनशिला अनावरण करुन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, नवीन पिढीला इतिहास कळावा, यासाठी शिवछत्रपतींची वाघनखे प्रेरणादायी आहेत असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याचे सांगून यापुढेही विकासकामांच्या प्रस्तावांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, राजगडच्या पायथ्याशी मौजे पाल ता. वेल्हा येथील राजमाता सईबाई स्मृतीस्थळ आराखड्याला 30 कोटींचा निधी, वडजल ता. जुन्नर येथील शिवनेरी संग्रहालयाला 300 कोटी, मौजे तुळापूर हवेली येथील छत्रपती संभाजी महाराज बलीदान स्थळाच्या विकासासाठी 300 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. शिराळा सांगली येथे स्मारक, प्रतागपडच्या पायथ्याशी वीर जीवा महाला यांच्या स्मारकासाठी जागा निवडण्यात आली आहे. रायगड किल्ल्यावर शिवराज्यभिषेक सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. शिवनेरीच्या विकासासाठी देखील आराखडा तयार करुन निधी देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री सरदार मोलोजीराजे भोसले यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या इंदापूर ऐतिहासिक गढीच्या संवर्धनासाठी 40 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले.
शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे जतन, संवर्धनाकरिता विशेष निधीची तरतूद केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा सांगणाऱ्या वेल्हा तालुक्याचे नाव आता राजगड करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रतापगड, रायगड, शिवनेरी, याबाबतच्या कुठल्याही कामाला निधी कमी पडू देणार नाही. तरुण किल्ल्यांवर मद्यपान करता याबाबत अधिक कायदा कडक करण्यात येणार आहे.
- कणकवली-कुडाळमध्ये राणे बंधूंचा दबदबा; विरोधकांचा दारुण पराभव
- एक है तो ‘सेफ’ है ! मोदी है तो मुमकिन हैं !; देवेंद्र फडणवीस यांची महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर पहिली प्रतिक्रिया
- परळीत धनंजय मुंडे यांचा विजय, राजेसाहेब देशमुखांचा पराभव
- भाजप उमेदवाराच्या बहिणीवर धामणगावात हल्ला
- नाशिकमध्ये भाजपची मोठी कारवाई, ७ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी