सोलापूर : ‘पूर्वी अक्कलकोट (Akkalkot) हा महाराष्ट्राचा शेवटचा तालुका मानला जायचा परंतु आम्ही ही भूमिका बदलली, आता महाराष्ट्राची सुरुवात अक्कलकोटपासून होत आहे,’ असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलय. दरम्यान, अक्कलकोट, सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे आज सोलापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित लाडक्या बहिणींशी आणि भावांशी संवाद साधला.
‘पूर्वी अक्कलकोट हा महाराष्ट्राचा शेवटचा तालुका मानला जायचा परंतु आम्ही ही भूमिका बदलली, आता महाराष्ट्राची सुरुवात अक्कलकोटपासून होत आहे. आज 22 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर 240 किमीचा प्रवास करून 51 गावांसाठी पाणी येत आहे. यासोबतच 27 वर्ष बंद पडलेल्या एकरुख योजनेला राज्य सरकारने दिलेल्या ₹412 कोटींच्या सुप्रमामुळे येथे सर्वसामान्यांना पाणी मिळत आहे.
यावेळी त्यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.
✅करनूर धरणापासून 16 किमीची जलवाहिनी
✅ 2 एमएलडीचे जलकुंभ असलेली ₹47 कोटींची दुधनी शहर पाणीपुरवठा योजना
✅22 किमीच्या जलवाहिन्या
✅75 केव्हीपीचे सौर ऊर्जा प्रकल्प
✅अक्कलकोट शहरातील ₹102 कोटींच्या रस्त्यांचे काम
✅100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय
✅अक्कलकोट ते बरुरपर्यंतच्या रस्त्याचे काम
✅अमृत-2 मधून पाणीपुरवठा योजनेसाठी ₹72 कोटी
✅देगाव एक्स्प्रेस कॅनलला ₹350 कोटी देऊन त्याची सुरुवात
✅अक्कलकोट शहरासाठी ₹137 कोटींचे भूमिगत गटार
✅उत्तर आणि दक्षिणचे पोलिस स्टेशन आणि दुय्यम निबंधक कार्यालय
मंदिर निर्माण व जीर्णोद्धार
✅धोत्री येथील नागनाथ मंदिर
✅गोरमणी येथील ब्रह्मनाथ मंदिर
✅मेंदरगी येथील वीरशैव शिवाचार्य श्रीगुरू संस्थान
✅हिरेमठ नागनसून येथील श्री बसवालिंगेश्वर मठ
✅किनी येथील वीरभद्रेश्वर मंदिर
✅दुधनी येथील मल्लिकार्जुन मठ
✅ग्रामदैवत मल्लिकार्जुन यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार
शेतकऱ्यांना वीजबिल माफी, मागेल त्याला कृषिपंप, ₹1 मध्ये पिकविमा, एसटीमध्ये महिलांना सूट, लाडकी बहीण योजना अशा राज्य सरकारने लागू केलेल्या तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांची विस्तृतपणे माहितीही याप्रसंगी दिली. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार राम सातपुते, आमदार समाधान अवताडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.