Tuesday, January 13, 2026

अमित, तू तर चुलत काकांच्याही पुढे गेलास!

Share

मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुंबई Tak चॅनेलच्या “महाचावडी” कार्यक्रमात चुलत चुलत भावाबरोबर फेरफटका मारता मारता दिलेल्या मुलाखतीत “मराठी मुसलमान रहातात तिथे कधीच दंगल होत नाही” म्हणून मराठी मुसलमानांना क्लीन चीट दिली आहे. म्हणजे ९२/९३ च्या मुंबई दंगलीतील सजा भोगणाऱ्या सर्व मराठी मुसलमान गुन्हेगारांना आता दोषमुक्त करायला हरकत नाही.

दाऊद इब्राहिम कासकरने भारतात परतायला हरकत नाही. त्याच्यावर कोणताही खटला चालवण्याची आवश्यकता नाही. कारण मनसे न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय अमित ठाकरे यांनी त्याला “बाइज्जत बरी” केले आहे. जमल्यास त्याने मुंबईतून एखादी निवडणूक लढवावी. तो मराठी मुसलमान असल्यामुळे विशाल हृदयाच्या अमित ठाकरे यांची मनसे त्याला नक्की तिकीट देईल. महाराष्ट्रात तो मंत्री किंवा मुंबईचा महापौर देखील होऊ शकतो.

महाराष्ट्रातल्या सर्व पोलीस ठाण्यातील दंगलीतील संशयित परंतु फरार अशा सर्व मराठी मुसलमान आरोपींचे फोटो त्वरित काढून टाकले पाहिजेत कारण मराठी मुसलमान कधीच दंगल करत नाही असे प्रमाणपत्र महाराष्ट्राचे भावी गृहमंत्री खुद्द अमितजी ठाकरे यांनी दिलेले आहे. अमित ठाकरे ज्या बॉम्बे (अजूनही मुंबई नाही, बॉम्बेच हां) स्कॉटिश शाळेत शिकले आहेत तिथे त्यांना काय इतिहास शिकवला गेला तो आम्हाला माहित नाही परंतु इतिहासात पहिल्यांदा धर्माच्या आधारावर आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन झाले, त्यावेळी सिंधमधल्या हिंदूंना आपली पैतृक संपत्ती घरदार जमीन जुमला शेतीवाडी सोडून रावी पार शरणार्थी म्हणून भारतात जायला भाग पाडणारा मुसलमान बाहेरून कुठूनही आला नव्हता. तो त्यांच्या शेजारी राहणारा सिंधी मुसलमान होता अगदी आमच्या मराठी मुसलमान शेजाऱ्यासारखाच. तीच कथा पंजाबच्या लाहोरची… तीच कथा बलुचिस्तानच्या क्वेटाची… तीच कथा खैबर पख्तुनख्वाच्या पेशावरची आणि तीच कथा बांगला देशातल्या ढाक्याची…

लक्षावधी हिंदूंचा नरसंहार करून आमच्या हजारो आया बहिणींची अब्रू लुटून आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे धर्माच्या आधारावर विभाजन करणारे जिहादी मुसलमान कुठूनही बाहेरून आले नव्हते. तर ते तिथल्या तिथल्या हिंदूंचे शेजारीच होते. अगदी तुमच्या आमच्या अमित ठाकरेंच्या मराठी मुसलमान शेजाऱ्यांसारखेच आणि आमच्या मातृभूमीच्या विभाजनाच्या आधी १९४५ साली जी सार्वत्रिक निवडणूक झाली होती त्यात आम्हाला धर्माच्या आधारावर वेगळा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हवा म्हणून निवडणूक लढणाऱ्या मुस्लिम लीगला अभूतपूर्व यश मिळाले होते. मुस्लिम लीगला मुसलमानांसाठी ठेवलेल्या ३० राखीव जागांवर शत प्रतिशत यश मिळाले होते. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे राष्ट्रपिता कायदे आजम बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचा मतदार संघ मुंबईतला भायखळा होता. अमित ठाकरे यांच्या निवासस्थाना जवळचा भायखळा मतदार संघ. अमित ठाकरे यांच्या शेजारी मराठी मुसलमानांनी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिले होते.

फाळणीनंतर याच्यातला फारच थोडा मराठी मुसलमान इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला गेला. ज्यांना आपण मुसलमान म्हणून धर्माच्या आधारावर वेगळा देश हवा होता त्याच्यातला बहुतांशी मराठी मुसलमान इथेच महाराष्ट्रात राहिला. तुमचा आमचा अमित ठाकरे यांचा शेजारी म्हणून काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी हिंदूंना एका रात्रीत नेसत्या वस्त्रानिशी घरदार सोडायला भाग पाडणारा मुसलमान बाहेरून कुठूनही आला नव्हता. तो त्यांचा शेजारी काश्मिरी मुसलमानाच होता. अगदी आमचा मराठी मुसलमान शेजारी आहे तसाच.

आजही बांगलादेशात हिंदूंचा जो नरसंहार चालला आहे तो बाहेरून जाऊन कोणी मुसलमान करत नाहीये. बांगलादेशातील बंगाली भाषिक मुसलमान बांगलादेशातील बंगाली भाषिक हिंदूंची कत्तल करतो आहे. जे इतिहास विसरतात त्यांच्या नशिबी पुन्हा तोच इतिहास लिहिला जातो असे इतिहास सांगतो.

आपले विचार उदात्त आहेत आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. आपण चुलत काकांच्याही पुढे गेलो आहोत असला भंपकपणा करण्याच्या आधी अमित ठाकरे यांनी आपल्या वडिलांकडे आपल्याला ब्रुस ली म्हणणारे आपले चुलत आजोबा मुसलमानांचा कोणत्या दोन अक्षरी लाडक्या विशेषणाने उल्लेख करायचे. याची एकदा चौकशी करावी. एकदा ते विशेषण कळले की, अमित ठाकरे आपोआप मराठी मुसलमानांना कॅरेक्टर सर्टिफिकेट वाटणे आपोआप बंद करतील. अन्यथा सत्तेसाठी मुसलमानांचे अपरिमित लांगुलचालन करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची आज जी वाताहात झाली आहे. तीच अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेची अटळ नियती असेल.

– मालवणी खवट्या

अन्य लेख

संबंधित लेख