Friday, March 6, 2026

नागपूरचे कल्याणेश्वर मंदिर आणि अमरावतीची हनुमान गढी; विदर्भातील दोन मोठ्या पर्यटन प्रकल्पांना बूस्टर डोस

Share

मुंबई : अमरावती शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या हनुमान गढी परिसराचा कायापालट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत या परिसराच्या विकासासाठी १२१ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली. “हनुमान गढी परिसर हे केवळ धार्मिक स्थळ न राहता, एक उत्कृष्ट पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे,” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

अमरावती शहरालगत असलेल्या हनुमान गढी परिसरात पर्यटकांच्या सुविधांची कामे आधी पूर्ण करावी. ही कामे दर्जेदार असावीत. या पर्यटन केंद्राचे मुख्य आकर्षण असलेल्या हनुमान मूर्तीचे काम पूर्ण करावे. संपूर्ण परिसर उत्कृष्ट धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीदरम्यान दिले.

हनुमान गढी परिसराचा विकास करताना पर्यटकांसाठी सुविधा कामांना प्राधान्य द्यावे. या विकास आराखड्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावी. हनुमान गढी स्थळाच्या विकासानंतर हे ठिकाण अमरावती शहरालगत पर्यटकांसाठी पर्यटन केंद्राची पर्वणी ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच नागपूर शहरातील महाल परिसरात असलेल्या पुरातन कल्याणेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. नागपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराचा विकास करताना पार्किंग महत्त्वाचे ठरणार असून या परिसरात पार्किंगची व्यवस्था उभारण्यात यावी. मोठ्या संख्येने वाहनांची पार्किंग होईल, अशा पद्धतीने करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

नागपूरच्या ‘कल्याणेश्वर मंदिर’ परिसराचाही होणार विकास
याच बैठकीत नागपूरमधील महाल परिसरातील पुरातन कल्याणेश्वर मंदिर विकासावरही चर्चा झाली. नागपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिराचा विकास करताना पर्यटकांच्या सोयीसाठी भव्य पार्किंग व्यवस्था उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस दिले आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख