Thursday, April 3, 2025

विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच…

Share

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अनेक नेत्यांचं पक्षांतर सत्र सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच सुरू असताना, पक्षबदलाचे वारेही जोरदार वाहात आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय मोर्चेंबाधणीला सुरुवात झाली आहे. भाजपने रविवारी आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यानंतर आता पुढे काय घडणार कोण कोणत्या जागांवर आपले उमेदवार जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
माजी आमदार कपिल पाटील यांनी काल दिल्लीत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वाशिम जिल्ह्यातले वंचित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी काल मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काल कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवरच हा पक्ष प्रवेश केला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान बीडमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लवकरच पुढचा राजकीय निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं.

अन्य लेख

संबंधित लेख