Thursday, October 10, 2024

माढ्यात आ. बबनराव शिंदेंविरोधात पुतण्याचे बंड

Share

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माढ्याचे आ. बबनराव शिंदे यांच्या विरोधात त्यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी जाहीरपणे बंडाची ‘तुतारी’ फुंकली आहे. माढा तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तसेच तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी केले. माढा तालुक्याचे राजकारण फक्त कारखानदारांभोवतीच फिरत आहे. माढा विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढवण्यास इच्छुक आहे असे धनराज शिंदे यांनी सांगितले.

माझ्यावर अकलूजला गेल्यावर टीका केली. परंतु या आधी पण प्रत्येक निवडणुकीमध्ये अकलूजकरांची मदत घेतली जात होती. आमच्या कुटुंबाला सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्यापासून आजपर्यंत मदत होत आली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख