Thursday, October 10, 2024

महादेव जानकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला; बहिणीने भावाच्या घरी..,

Share

बारामती लोकसभा : राज्याचंच नव्हे तर देशभराचं लक्ष लागून असलेल्या बहुचर्चित बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात पवार कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये पहिल्यांदाच लढत पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचे (Sharad Pawar) वर्चस्व राहणार की अजित पवार (Ajit Pawar) बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडून निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु आहे.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Paksha) अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) बारामती दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. “सुप्रिया ताईंना मी सांगेन बहिणीने भावाच्या घरी जास्त दिवस नाही राहिलं पाहिजे. बहिणीने तीच्या घरी जावं, देशात एनडीएचं सरकार बनत आहे, बारामतीचा खासदार हा सरकारला समर्थन करणारा बनावा म्हणून सांगायला आलोय” असा खोचक टोला जानकरांनी सुप्रिया सुळेंना हाणला. त्याच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

तसेच उत्तम जानकर यांच्याबद्दल बोलतांना महादेव जानकर म्हणजे, म्हणाले, :”उत्तम जानकर हे आमदारकीच्या उमेदवारीसाठी जात बदलत आहेत. त्यामुळे अशा लोकांवर मी बोलणे पसंत करत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. आपल्यावर प्रेम करणारा ओबीसी समाज अजितदादांच्या पाठिशी” असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

अन्य लेख

संबंधित लेख