Sunday, November 24, 2024

मविआ ला मत म्हणजे योजना बंद आणि महायुतीला मत म्हणजे योजना सुरू – चंद्रशेखर बावनकुळे

Share

महाराष्ट्र : आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यातील महायुती सरकार आणि विरोधी महाविकास विकास आघाडीचे नेते सध्या आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहेत. दरम्यान, “महाविकास आघाडीला मत म्हणजे योजना बंद आणि महायुतीला मत म्हणजे योजना सुरू,” असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) माध्यमांशी बोलतांना म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, संकलन समितीच्या बैठकीत तिन्ही पक्षाचे एक-एक सदस्य आहेत. आणि सहयोगी पक्षाचे नेते मिळून १०-१५ जणांची संकलन समिती विधानसभा लेवल वर २८८ समित्या बनवली जाईल. पूर्ण निवडणुकीचं संकलन समिती करेल. निवडणुकीत कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. आणि कस जिंकणार हे पाहावं लागणार. सगळ्या समाजाला, धर्माला सोबत घेऊन कसं निवडणूक लढवायच. विकासाची गंगा घरामध्ये पोहचवण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र एक इंजिन आणि महाराष्ट्राचं एक इंजिन असं मिळून डबल इंजिन सरकार जनतेचं भलं करू शकते,” असं ते ,हणाले.

दरम्यान, “महाविकास आघाडी सत्तेत आली तर सगळ्या योजना बंद करून टाकेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना १५ येजना बंद करून टाकल्या होत्या. महाविकास आघाडीला मत म्हणजे योजना बंद आणि महायुतीला मत म्हणजे योजना सुरू हे आम्ही महाराष्ट्रातील घरा-घरात जाऊन सांगणार आहोत,” असं ते म्हणाले. हे महाराष्ट्राच्या विकासासाठी, १४ करोड जनतेच्या सामाजिक विकास, शैक्षणिक विकास, युवकांचा विकास, या माध्यमातून महाराष्ट्राचा जीडीपी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी, व्यापारी, महिला, तरुण यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. संचलन समिती जो निर्णय घेईल तो २८८ विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते महायुतीला विजयी करण्यासाठी काम करतील,” असा विश्वास असल्याचं यावेळी त्यांनी म्हंटल.

अन्य लेख

संबंधित लेख