Sunday, May 26, 2024

शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरतांना मविआतील वरीष्ठ नेत्यांची अनुपस्थिती

Share

Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Lok Sabha Constituency) मंगळवारी महाविकास आघाडी (MVA) कडून छत्रपती शाहू महाराजांनी (Chhatrapati Shahu Maharaj) शाही शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या उमेदवारी अर्ज भरतांना मविआतील एकही वरीष्ठ नेता उपस्थित नव्हता. यावरून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी मविआ राज्यातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले, कोल्हापूरमध्ये हि लोकप्रिय घोषणा आहे, “मान गादीला अन मत मोदीला” हा सन्मान आम्ही बाळगतोय मात्र आज कोल्हापूरच्या गादीचा सन्मान राखण्यासाठी मविआतील एकतरी वरिष्ठ नेता यायला हवा होता. तसंच, मविआ मधील वरिष्ठ नेत्यांनी महाराजांचा अपमान केला आहे का? असा प्रश्न यावेळी मंडलिक यांनी उपस्थित केला.

NB मराठीच्या WhatsApp चॅनल फॉलो करा : https://whatsapp.com/channel/0029VaWO0HLCRs1iZlueP42F

अन्य लेख

संबंधित लेख