महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde )आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ( ०४ सप्टेंबर ) लातूर जिल्ह्यातील उदगीर परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही घरणी व चाकूर येथील नुकसानग्रस्त शेतजमिनींची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिले.
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही परभणी जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून महसूल व इतर संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामा करण्याचे निर्देश दिले.
धाराशिवमध्ये सुमारे सहा हजार ६७ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे तर बीडमध्ये दोन लाख तीन हजार चारशे १५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. भंडारा येथे मिरची, वांगी, कडबा, झोल या पिकांची नासाडी झाली आहे.