Sunday, April 20, 2025

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे रूग्णांच्या मदतीसाठी २ वर्ष २ महिन्यात ३२१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित

Share

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे रूग्णांच्या मदतीसाठी २ वर्ष २ महिन्यात ३२१ कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं आहे. मुंबईतल्या मंत्रालय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यालयामधून २९२ कोटींपेक्षा अधिक आणि नागपूर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यालयाद्वारे २८ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करण्यात आलं. त्यामाध्यमातून ४०,००० हून अधिक गंभीर रुग्णांचे  प्राण वाचले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याची ही गरज नाही, पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया करून वैद्यकीय मदत मिळते. यासाठी ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळविता येतो.

 ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश करण्यात आला. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी,  कर्करोगावरील शस्त्रक्रिया , केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर  इनप्लांट शस्त्रक्रिया , सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात , विद्युत अपघात , भाजलेले रुग्ण , जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,’ असं आवाहन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितलं आहे.

अन्य लेख

संबंधित लेख