Wednesday, October 7, 2026

झुरळांचा क्रांतिनायक : मदरसा छाप मॅट्रिक फेल स्वयंघोषित ‘मुक्त पत्रकार’ नदीम अहमद

Share

तरुणाईच्या मनात चीड उत्पन्न करून त्यांना हिंसाचारास चिथावणे आणि दंगली भडकावून भारतात अराजक माजवणे अशा उद्देशाने कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून एआय वापरून दिल्ली पोलिसांच्या विरोधात डीप फेक व्हिडीओ बनवून प्रसारित करण्याऱ्या नदीम अहमद या २४ वर्षाच्या जिहाद्यांला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. मूळ हरयाणातील असलेला नदीम दिल्लीत साकेत येथील एका मदरशात शिकत होता. दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर त्याने शिक्षण सोडले आणि स्वतःला तालिब म्हणवून घेत तब्बल आठ वर्षे उत्तर भारतातील मशिदींमध्ये फिरत राहिला. पण कॉकरोच जनता पक्ष अस्तित्वात येण्याच्या सुमाराला त्याने एक इंस्टाग्राम अकाउंट काढून स्वतःला ‘मुक्त पत्रकार’ म्हणवून घेणे सुरु केले. जिहादी कट्टरवादी, डाव्या परिसंस्थेतील संघटना मतपेढीच्या राजकारणासाठी त्याच्यापुढे लाळघोटेपणा करणारे राजकीय पक्ष आणि देशातील आणि भारताबाहेरील अराजकवादी शक्ती यांच्यापासून देशाच्या सुरक्षेला असलेल्या संभाव्य धोक्याचा इशाराच या घटनेतून मिळतो. 

मूळ हरयाणातला असलेला नदीम अहमदला त्याचे वडील फारुख अहमदनी दिल्लीतील साकेत भागात एका मदरशात शिकायला पाठवले. तिथे जाऊन नदीम कट्टर नमाजी बनला, पण दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यावर शिक्षण सोडून दिले. पुढील आठ वर्षे तो भरकटत राहिला. औपचारिक शिक्षण नाही, आधुनिक ज्ञानात फारसे स्वारस्यही नाही आणि त्यामुळे रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता पण नाही अशी अवस्था मदरशातील अनेक विद्यार्थ्यांची होते. त्याची परिस्थिती काही वेगळी नसते. मदरशातून बाहेर बसलेले अनेक विद्यार्थ्यांप्रमाणेच त्याने स्वतःला ‘तालिब’ म्हणवून घेत उत्तर भारतातील राज्यांमध्ये फिरत मशिदींना भेटी देणे सुरु केले. 

पण काही महिन्यांपूर्वी कॉकरोच जनता पक्षाचा उदय झाला आणि नदीमच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. अचानक त्याने स्वतःला ‘स्वतंत्र पत्रकार’ म्हणवून घेण्यास सुरुवात केली आणि डाव्या परिसंस्थेशी जवळीक साधत भारतात अराजकता पसरवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. कॉकरोच जनता पक्षाने निवडणूक आयोग आणि ईव्हीएमच्या विरोधात दिल्लीत आयोजित केलेल्या आंदोलनामध्ये दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून एका महिला आंदोलकाचा लैंगिक छळ होत असल्याचा डीपफेक व्हिडिओ त्याने समाजमाध्यमांवर प्रसारित केला. हा व्हिडीओ पाहून आंदोलक भडकतील आणि हिंसाचार सुरु करतील, त्यातून दंगली पेटतील आणि भारतात अराजक माजेल असा त्याचा त्यामागे हेतू होता. पण एआय वापरून त्याने बनवलेला तो व्हिडीओ दिल्ली पोलिसांच्या निदर्शनास आला आणि तो पोलिसांच्या तावडीत सापडला.

पत्रकार होण्यासाठी बहुश्रुतता, विविध विषयांचा अभ्यास, भाषिक प्राविण्य असे अनेक गुण आवश्यक असतात. नदीमकडे यातील कोणताच गुण नव्हता. पण त्याने एआय सॉफ्टवेअर वापरून डीप फेक व्हिडीओ बनवण्यात कौशल्य मिळवले. विचार करणारी व्यक्ती असल्याचा आव आणून अद्याप परिपक्व नसलेल्या तरुणाईला भुलवण्यासाठी त्याने ध्रुव राठीसारख्या डाव्या परिसंस्थेतील इन्फ्लुएन्सर्सना समाजमाध्यमांवर फॉलो केले. दुसऱ्या बाजूला कॉकरोच जनता पक्षाला फॉलो करून त्याने डाव्या परिसंस्थेशी सलगी साधली. या भांडवलाचा वापर करून त्याने सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वी news_aaina0776 या नावाचा इंस्टाग्राम अकाउंट सुरु केला आणि स्वतःला “मुक्त पत्रकार” म्हणवून घेणे सुरु केले. या अकाऊंटवरून तो स्वतःचे काही मेसेज आणि डाव्या परिसंस्थेतील लोकांनी प्रसारित केलेले काही संदेश वितरित करत होता.

एप्रिल-मे महिन्यात त्याने हे प्रोफाइल सुरू केल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांत त्याचे २४.४ हजार फॉलोअर्स झाले. त्याच्या तथाकथित ‘न्यूज आईना’च्या लक्ष्यित प्रेक्षकांपैकी कुणीही त्याची पार्श्वभूमी किंवा विश्वासार्हता तपासण्याची तसदी घेतली नाही असे दिसते.

कॉकरोच जनता पक्षाने ४ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन केले, तेव्हा नदिमने एक डीपफेक व्हिडिओ प्रसारित केला. या व्हिडिओमध्ये दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आंदोलनादरम्यान एका महिलेचा लैंगिक छळ केल्याचे खोटे चित्रण करण्यात आले होते. हा AI-निर्मित व्हिडिओ दिल्ली पोलिसांच्या सोशल मीडिया वॉच टीमच्या निदर्शनास आला. या टीमने त्याबाबत सायबर पोलिस ठाण्याला माहिती दिली. तांत्रिक विश्लेषणानंतर पोलिसांनी नदिमची ओळख पटवली आणि हरियाणात त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली.

पोलिसांनी पकडल्यावर मात्र नदिमने सगळे काही सांगण्यास सुरुवात केली. आपण ३ ऑक्टोबर रोजी AI टूल्सचा वापर करून डीपफेक व्हिडिओ तयार केला आणि आंदोलनाच्या वेळी तो इन्स्टाग्रामवर प्रसारित केला अशी कबुली त्याने दिली. दिल्ली पोलिसांची प्रतिमा मलिन करणे, आंदोलकांना आक्रमक होण्यासाठी चिथावणे आणि त्यांनी हिंसाचार करून दंगल पसरवावी यासाठी त्यांना प्रवृत्त करणे, हा डीपफेक व्हिडीओ प्रसारित करण्यामागील उद्देश असल्याचे त्याने सांगितले. भारतात अराजकता पसरावी, यासाठी जमाव हिंसक व्हावा अशी त्याची इच्छा होती आणि म्हणूनच त्याने दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला असेही त्याने पोलिसांना सांगितले.

संपूर्ण घटना आणि नदिमची कबुली यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात. सर्वप्रथम, दिल्ली पोलिसांना ज्याचा छडा लावावा लागेल असा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, भारतात व्यापक हिंसाचार आणि अराजकता पसरवण्याच्या एखाद्या मोठ्या आणि पूर्वनियोजित कटाचा नादिम भाग होता का? तो हे सर्व स्वतःच्या बळावर करत होता की एखाद्या संघटित गटाकडून त्याला आर्थिक मदत, सहकार्य आणि अन्य प्रकारची मदत मिळत होती, याचाही पोलिस शोध घेत आहेत.

‘स्वतंत्र पत्रकार’ असल्याचे भासवत असताना त्याने गोळा केलेली कोणतीही संवेदनशील माहिती भारतातील किंवा भारताबाहेरील कोणाला दिली होती का, याचीही पोलिस चौकशी करत आहेत. थोडक्यात, पत्रकाराचा मुखवटा वापरून त्याने हेर म्हणून काम केले असण्याची शक्यताही तपासली जात आहे. त्याच्या उत्पन्नाचे स्रोत काय होते आणि त्याला कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने आर्थिक मदत केली होती का, याचाही पोलिस शोध घेत आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांसाठी चिंतेचा आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे ‘स्वतंत्र पत्रकार’, ‘फ्रीलान्स पत्रकार’ किंवा ‘इन्फ्लुएन्सर’ अशा आकर्षक उपाध्या वापरून विविध संवेदनशील ठिकाणी आणि महत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत विनामूल्य प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींची ओळख आणि त्यांची सत्यता पडताळून पाहणे. सोमवारी दिल्ली पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींना त्यांची अधिकृत ओळखपत्रे प्रदर्शित करण्यास सांगणारी चार मुद्द्यांची सूचना जारी केली. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे एक आवश्यक पाऊल आहे

अन्य लेख

संबंधित लेख