नागपूर मधल्या कामठी येथे ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात या मंदिराचा 27 वा वर्धापन दिन कार्यक्रम होत आहे . या महोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन केले गेले . यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की भगवान बुद्धांनी भारतात बुद्धत्व प्राप्त करून जगाला प्रज्ञा , करुणा आणि शील याचा संदेश दिला. भारताच्या मातीत, संस्कृतीत निर्माण झालेला बौद्ध धम्म आज जपान सह अनेक देशांमध्ये पोहोचलेला आहे. भारत आणि जपान यांच्यात राजकीय संबंधांसोबत संस्कृतीचे, तसेच वैचारिक नातेही दृढ आहे. नागपूरची पवित्र दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस टेम्पल यामुळे शहराला जागतिक स्तरावर बौद्ध धम्माचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून ओळख मिळते आहे.
या कार्यक्रमाच्या दरम्यान ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा तथा माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, इंटरनॅशनल निचिरेन-शू फेलोशिप असोसिएशनचे अध्यक्ष भंते कानसेन मोचिदा, टोकियो (जपान) येथील मिनोबुसान कुओंजी टेम्पलचे व्हेनेरेबल तायकेन आओयामा, बुद्धगया येथील महाबोधी विहाराच्या इंटरनॅशनल त्रिपिटक चँटिंग सेरेमनीच्या मुख्य संरक्षक वांगमो डिक्सी, आमदार डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार जोगेंद्र कवाडे, यांच्यासह जपान येथील बौद्ध भिक्षू संघाच्या प्रतिनिधींची विशेष उपस्थिती होती.
केंद्र सरकारने सेव्हन वंडर्स ऑफ लँड या संकल्पने अंतर्गत भारतामध्ये श्रवणबेलगोला, कर्नाटक मध्ये असलेली गोमतेश्वरची मूर्ति, अमृतसर, पंजाबच स्वर्ण मंदिर / हरमंदिर साहिब, आगरा, उत्तर प्रदेश मधला ताजमहल, कर्नाटक मधलं हम्पी, मध्य प्रदेश मधलं खजुराहोचे मंदिर, ओडिशा मधील कोणार्कचे सूर्य मंदिर, बिहार मधील नालंदा विश्वविद्यालयाचे अवशेष हे पर्यटक यांना आकर्षित करण्यासाठी निर्माण केली गेली आहे. ड्रॅगन पॅलेस टेम्पल या संकल्पनेमुळे जागतिक बौद्ध अनुयायी आणि पर्यटक नागपूरकडे आकर्षित होतील.
ड्रॅगन पॅलेस टेम्पल ची स्थापना नोव्हेंबर 1999 मध्ये जपान मधील प्रसिद्ध समाजसेविका आणि अध्यात्मिक नेत्या सुश्री नोरीको ओगावा यांनी ओगावा सोसायटी आणि सोसायटी फॉर प्रमोशन बुद्धिस्ट कल्चर अँड एज्युकेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून केली. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या दीक्षाभूमी मध्ये बौद्ध धम्मात भारतातल्या बहुसंख्य मागासवर्गीय आणि दलित समाजाला घेऊन आले. ते हे पवित्र स्थान नागपूरची दीक्षाभूमी. सुरुवातीच्या काळात हे स्थळ कमल मंदिर (Lotus Temple of Vidarbha) म्हणून ओळखल जात होतं. या मंदिरात एकाच वेळी शेकडो लोक शांतपणे विपश्यना म्हणजेच ध्यानधारणा करू शकतात. या मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले गौतम बुद्धांचे मूर्ती ही जपानमधून आणलेल्या अखंड चंदनाच्या लाकडापासून कोरलेले आहे. कोणत्याही आधाराशिवाय उभारलेल्या या मंदिराच्या भव्यछताच्या अभियांत्रिकी कौशल्यबाबत या वास्तूला आंतरराष्ट्रीय काँक्रीट स्ट्रक्चर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.
ड्रॅगन पॅलेस ही संकल्पना भारतीय बौद्ध परंपरेतील नागलोक या संकल्पनेशी जोडलेली आहे. बौद्ध धर्माचा आशिया मधल्या राष्ट्रात प्रसार झाला तेव्हा ड्रॅगन पॅलेस ही संकल्पना तयार झाली. या पौराणिक राजवाड्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन भारतात आणि जगभरात अनेक प्रसिद्ध वास्तू व मंदिरे उभारली गेली आहेत. भारतीय नाग संस्कृती आणि बौद्ध साहित्यातील सागरी व नागराज संकल्पना पुढे चीन, कोरिया आणि जपानच्या लोकपरंपरेत मिसळून ड्रॅगन पॅलेस या संकल्पनेत रूपांतरित झाल्या. पूर्व आशिया मधील संस्कृतीमध्ये ड्रॅगन हा युरोपियन राष्ट्रातल्या कथेप्रमाणे विध्वंसक किंवा आग ओकणारा राक्षस मानला जात नाही. हा ड्रॅगन मनुष्य समाज जीवनासाठी पाणी, पाऊस, नद्या, समुद्र, समृद्धी, शहाणपणा, आणि राजसत्तेचा प्रतीक मानला जातो. कृषी प्रधान समाजामध्ये पाऊस आणि जल स्त्रोतांवर जीवन अवलंबून असल्यामुळे ज्या शक्ती पाण्यावर नियंत्रण ठेवतात त्यांचं निवासस्थान म्हणजे ड्रॅगन पॅलेस अशी मान्यता आहे.
जपानमध्ये ड्रॅगन पॅलेस र्यूगू-जो (Ryūgū-jō) या नावाने ओळखला जातो. समुद्रदेवता र्यूजिन (Ryūjin) याचा हा महाल कासवाचा बचाव करणाऱ्या मच्छीमार उराशिमा तारो (Urashima Tarō) याच्या कथेमुळे सर्वाधिक लोकप्रिय झाला.
जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरात अनुभव हल्ल्यानंतर जपानने जागतिक शांततेसाठी काही परिषदांचा आयोजन करण्याच्या योजना बनवल्या होत्या. या योजनेतून जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार आणि कोरिया यासारख्या देशातील बौद्ध भिक्खू आणि अभ्यासात या परिषदांमध्ये सहभागी होतात. ऐतिहासिक काळापासून विदर्भ ही बौद्ध संस्कृतीची भूमी राहिली आहे. पवनी, मनसर आणि नागपूर मध्ये पुरातत्व विभागाच्या उत्खननातून हे सिद्ध झालं आहे. या परिसरात पाली भाषा, बौद्ध तत्त्वज्ञान आणि जपानी संस्कृती यांचा तुलनात्मक अभ्यास करणारे एक जागतिक दर्जाचे विद्यापीठ किंवा संशोधन केंद्र उभारले जाण्यासाठी प्रस्तावित आहे.