Thursday, September 19, 2024

धुळे जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा सुलवाडे-जामफळ प्रकल्प पुर्णत्वाच्या दिशेने

Share

धुळे : सुलवाडे-जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या जामफळ धरण बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या माध्यमातून येत्या वर्षभरात धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील सव्वा लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार असून या प्रकल्पामुळे या परिसरातील शेती ही सुजलाम सुफलाम होवून येथील परिसरात हरीत क्रांती होईल. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी केले. सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेअंतर्गत जामफळ धरणाच्या 26,907 हेक्टर लाभक्षेत्राला बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या माध्यमाने पाणी पुरविण्याच्या कामाची पाहणी आणि भूमिपूजन उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की, आजचा दिवस धुळे जिल्ह्यासाठी महत्त्वाचा दिवस आहेत. आजपासून खऱ्या अर्थाने शिंदखेडा तालुक्याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहेत. या प्रकल्पामुळे शिंदखेडा तालुक्यातील सव्वा लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहेत. सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेला सन 1999 मध्ये मंजूरी दिली. सन 1999 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यापासून 18 वर्षांत 26 कोटी निधी उपलब्ध झाला. तर गेल्या सात वर्षात 2100 कोटी रुपयांचा निधी देऊन या प्रकल्पाला चालना दिली. हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना समक्ष भेटून पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्राचा दुष्काळ कायमस्वरुपी दूर करण्यासाठी बळीराजा जलसंजिवनी योजनेत समाविष्ट करुन राज्याच्या दुष्काळी भागासाठी कृषी सिंचन योजनेतून 30 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना त्वरीत मंजूरी दिली.

सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजनेचे काम मोठ्या गतीने सुरू असून पुर्णत्वाकडे आहे, त्यानंतर तापी नदीचे जामफळ धरणात आलेले पाणी शिंदखेडा तालुक्यातील 54 गावांना जामफळ धरणातून 728 किलोमिटर लांबीच्या भूमिगत पाईप लाईनद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा होणार आहे. यामुळे या गावातील एकूण 42 हजार 513 हेक्टर जमीन एका वर्षात सिंचनाखाली येणार आहे. या कामासाठी माजी खासदार डॉ. सुभाष भामरे व आमदार जयकुमार रावल यांनी सतत पाठपुरावा केल्याचेही त्यांनी सांगितले.

तापी नदीतील पावसाळ्यातील वाहून जाणारे महाराष्ट्राचे हक्काचे 9.24 टी.एम.सी पाणी 5 पंपगृहांमध्ये स्थापित होणाऱ्या 75 हजार 458 एचपी क्षमतेच्या 32 पंपाद्वारे उपसा करून शिंदखेड्यातील 54 गावातील 42 हजार 513 हेक्टर तर धुळे तालुक्यातील 49 गावातील 10 हजार 207 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तसेच हे पाणी पांरपरिक पद्धतीने कालवा वितरण प्रणाली ऐवजी गुरुत्वीय बंदिस्त वितरण प्रणालीद्वारे देण्यात येणार असल्याने वीजेचा खर्च कमी येणार आहे. येत्या काळात शेतकऱ्यांना सोलरमार्फत वीज पुरवठा करण्यात येऊन शेतकऱ्यांना वर्षभर दिवसा वीज देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खान्देशातील प्रकाशा बुराई सिंचन योजना, अनेर मध्यम प्रकल्प, वाडी शेवाडी मध्यम प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मनमाड-धुळे-इंदौर रेल्वेमार्गामुळे भविष्यात धुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महायुती सरकारने राज्यातील नागरिकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, महिलांना एस.टी बस मध्ये 50 टक्के सवलत, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत 10 लाख युवकांना रोजागार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांना निधीची कमतरता भासू देणार नाही असेही त्यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख