भारताच्या संविधान निर्मिती दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ओजस्वी आणि तेजस्वी प्रतिभेने कायदे मंडळ पुन्हा पुन्हा प्रभावित झाले.
देशाचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांनी केलेली अल्पकालीन पण प्रभावी कामगिरी देखील जणू एक दीपस्तंभ! संविधानाला मूर्तरूप देणारे घटनाकार!
पण त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल ३४ वर्षांनी त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला…. असे का?
त्यांचा दोन लोकसभा निवडणुकीत ठरवून का पराभव करण्यात आला? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भीती कोणाला वाटत होती? कोणाला आपल्यापेक्षा प्रभावी मंत्री नको होते?
१)२५ ऑक्टोबर १९५१ रोजी झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा देण्याचे कबूल केलेल्या काँग्रेसने ऐनवेळी दगा दिला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध उमेदवार उभा केला.साम दाम वापरून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे साथीदार फोडले.फारसा परिचित नसलेल्या उमेदवारामागे काँग्रेसने पूर्ण शक्ती उभी केली.तो उमेदवार म्हणजे नारायणराव काजरोलकर! यांनी फक्त 14 हजार 561 मतांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला….डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पडलेल्या मतांची संख्या होती १ लाख २३ हजार ५७६!
२)पुढं भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने पूर्ण शक्ती लावून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचां पराभव केला….विद्वान बाबासाहेब आंबेडकर डोईजड होतील म्हणून ते नको होते. देशाच्या पंतप्रधानांपेक्षा जास्त विद्वान मनुष्य काँग्रेस इकोसिस्टीमला नको होता…
देशाच्या घटनेला ज्या महामानवाने मूर्त स्वरूप दिले,त्या महापुरुषांचा राजकीय पराभव काँग्रेसने दोन वेळा केला, पण वैचारिक पराभव मात्र करू शकले नाहीत.केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन मोकळे व्हावं वाटावं असे वातावरण तत्कालीन काँग्रेसच्या इकोसिस्टीम ने निर्माण केले होते…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर तब्बल 3४ वर्षांनी गैरकाँग्रेसी सरकारने भारतरत्न पुरस्कार दिला.१४ एप्रिल १९९० रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला… इतका उशीर का झाला? का केला गेला? काँग्रेसला असा भारतरत्न पुरस्कार का द्यावा वाटला नाही?
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे कितीतरी महापुरुष या देशांमध्ये असेच अन्यायाचे शिकार झालेले पाहायला मिळतील….. ! या गोष्टीला काँग्रेसची विचारधारा व घराणेशाही जबाबदार आहे.