Wednesday, December 4, 2024

ठाण्यातील पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी सांगितले महायुतीच्या यशाचे रहस्य

Share

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही त्यांची पहिली पत्रकार परिषद होती, त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे केंद्रित झाले होते.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल आणि आम्हाला दणदणीत विजय मिळवून दिल्याबद्दल मी महाराष्ट्रातील सर्व मतदारांचे आभार मानतो. त्यांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने केलेल्या विकासकामांमुळे आणि कल्याणकारी योजनांमुळेच महायुतीला हे यश मिळाले, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख