Friday, April 17, 2026

जगावर प्रभाव टाकणारा बंडखोर ख्रिश्चन धर्मगुरू: मार्टिन ल्युथर भाग २

Share

१७ जुलै १५०५ मध्ये मार्टिन ल्यूथर त्याचे युनिव्हर्सिटीमधील शिक्षण सोडून देऊन ऑगस्टिन चर्चमध्ये दाखल झाला. सेंट ऑगस्टिन हे सेंट पाॅलनंतरचे एक महत्वाचे संत म्हणून मानले जातात. त्यांच्या पंथातील शिस्तीप्रमाणे मार्टिन ल्यूथर आपले जीवन व्यतीत करू लागला. सेंट ऑगस्टिनचे सर्वात प्रसिद्ध वाक्य आहे “Faith is to believe what you do not see, the reward for this faith is to see what you believe.”

मार्टिनच्या भावी आयुष्यात या शिकवणुकीचा परिणाम आपल्याला दिसून येतो. मार्टिन ऑगस्टिन पंथाच्या शिस्तीनुसार उपास, करत असे तासनतास प्रार्थनेत व्यतीत करत असे, तीर्थयात्रा करत असे. पण मार्टिन ल्यूथर म्हणतो, हा व्यतीत केलेला काळ हा माझ्यासाठी आध्यात्मिक निराशेचा काळ होता. या काळात तारणहार त्राता येशूपासून मी दुरावलो होतो. येशूला मी माझ्या आत्म्याचा जेलर / जल्लाद बनवला होता. मार्टिनच्या या अस्वस्थतेची जाणीव चर्चमधील एका जेष्ठ व्यक्तीला झाली. त्याने मार्टिनला सुचविले की, त्याची अतिरेकी अंतर्मुखता त्याला त्रास देते आहे. या जेष्ठ व्यक्तीने मार्टिनला त्याने त्याचे करियर परत सुरू करावे असे सुचवले. आणि त्याला एरफर्टच्या प्रमुख चर्चमधे कॅथॅड्रलमधे जाण्यास सांगितले. तो तेथील विटेनबर्ग युनिव्हर्सिटीत धर्मशास्त्र शिकवू लागला. १५०८ मधे त्याला तिथे बायबलच्या अभ्यासातील डिग्री मिळाली. नंतर पीटर लोम्बार्ड याने लिहलेल्या फोर सेंटेन्सेस या धर्मशास्त्रावरील पुस्तकावर अजून एक डिग्री मार्टिन यांना मिळाली. १५१२ मधे त्यांना धर्मशास्त्रातील डाॅक्टरेट मिळाली. त्याची उर्वरीत सर्व कारकीर्द विटेनबर्ग युनिव्हर्सिटीत गेली. मार्टिन ल्युथरला १५१५ मधे सॅक्सोनी आणि सुरिंजिया या प्रांतांचा Vicar विकार बनवला गेला. Vicar म्हणजे दहा बारा चर्चेसचा व्यवहार पहाणारा प्रमुख.

१५१० मध्ये तो रोमला गेला होता, तेथील चर्चमधील ख्रिश्चन विद्वान, पंडितांचा भ्रष्टाचार पाहून त्याला धक्का बसला. मृत्युनंतर एक दिवस न्यायनिवाडा येणार आहे त्यावेळी केलेल्या पापांचा हिशेब होणार यापासून मुक्ती मिळायची असेल तर माणसाने सत्कर्म केले पाहिजे असे शिकवले जाई. या सत्कर्मात चर्चला देणगी देणे हेही अंतर्भूत असे. त्यासाठी चर्च काही वस्तू विकत असे, त्याला indulgences असे संबोधले जाई. या सत्कर्मामुळे माणसाचा नरकवास कमीत कमी होईल असे कॅथाॅलिक चर्चमधील माॅन्क सांगत असे.

१५१६ मधे रोममधील सेंट पीटर बॅसिलिका चर्चची पुनर्बांधणी करण्यासाठी पैसे उभे करायला जोहान टेट्रा याला जर्मनीला indulgences विकायला पाठवले. हे सर्व पाहून ३१ ऑक्टोबर १५१७ मध्ये असे indulgences विकण्याला विरोध दर्शवणारे पत्र लिहले. ख्रिस्ताने पापी व्यक्तीला पश्चाताप करणेस सांगितले आहे. Indulgences सारख्या बाह्य उपायांनी त्याचे अंतर्मन अशा पश्चात्तापापासून दूर राहते. व तो काही पैसे देऊन त्यापासून सुटका करून घेतो. पोप फक्त चर्चने दिलेल्या शिक्षेपासून सुटका करू शकतो पण अपराधी भावनेसाठी नाही.

Purgatory म्हणजे मृत्यूपासून न्याय व्हायच्या दिवसापर्यंत पापी माणसाला विविध शिक्षांना सामोरे जावे लागते (नरक) असा समज आहे त्यालाही मार्टिन विरोध करतो. ख्रिस्ताने दिलेले गाॅस्पेल हीच खरी चर्चची संपत्ती आहे. पोपकडे जगातील सर्वात जास्त संपत्ती असताना तो स्वतःच्या पैशाने सेंट पीटरच्या चर्चची बांधणी का करत नाही असाही प्रश्न मार्टिन ल्यूथर विचारतो. अशा अनेक सूचनावजा मागण्या त्याने बिशप यांचेकडे केल्या. त्या पंचाण्णव प्रबंध (Ninty five theses) म्हणून प्रसिद्धीस आल्या. विटेनबर्गमधील ऑल सेंट चर्चच्या दारावर या मागण्या त्याने खिळा ठोकून लावल्या असे सांगितले जाते. हा दिवस Reformation ची सुरूवात मानला जातो.

ल्यूथर मार्टिनने केलेल्या या पंचाण्णव मागण्या किंवा प्रबंध पहिल्यांदा लॅटिनमध्ये मग जर्मन भाषेमध्ये छापले आणि संपूर्ण जर्मनीत वाटले. फ्रान्स, इंग्लंड, इटली या सर्व ठिकाणी हे लिखाण पोचले. आणि ठिकठिकाणाहून विद्यार्थी मार्टिन ल्यूथरचे म्हणणे ऐकण्यासाठी विटेनबर्गला येऊ लागले. त्याची नव्या करारातील (New Testament) नवव्या पुस्तकावरील एक पुस्तिका त्याने प्रसिद्ध केली. या दरम्यान त्याने तीन पुस्तके लिहली.  To the Christian Nobility of the German Nation या पुस्तकात त्याने बाप्तिस्मा झालेला प्रत्येक ख्रिश्चन हा पुजारी किंवा पुरोहित आहे आणि त्याला वेगळ्या प्रिस्टची गरज नाही (priesthood of all believers) या पुस्तकातील दुसरा मुद्दा Two Kingdom म्हणजे दोन सत्ता एक स्पिरीच्युयल म्हणजे दैवी सत्ता आणि एक भौतिक  जगातील सत्ता मार्टिन ल्यूथर काय लिहतो ते पहा…

God has therefore ordained two
regiments: the spiritual, which by
The Holy Spirit produces Christians
and pious folks under Christ, and
the secular, which restrains
un-Christian and evil folk so that they
are obliged to keep outward peace,
albeit by no merit of their own
– Martin Luther

                                 – डॉ.प्रसाद केळकर

अन्य लेख

संबंधित लेख