मुंबई : आज राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान सुरू असताना मार्कर पेनने बोटावर लावलेली शाई सहज पुसली जाते, असा वाद निर्माण झाला आहे. यामुळे बोगस मतदान किंवा दुबार मतदानची भीती व्यक्त होत आहे. विरोधी पक्ष नेते, विशेषतः राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावर तीव्र टीका केली आहे. काही ठिकाणी व्हिडीओ व्हायरल झाले ज्यात sanitizer, acetone किंवा nail polish remover ने शाई सहज पुसली जात असल्याचे दाखवले गेले.
यावर, राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट उत्तर…
बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचचरोबर बोटावरची शाई पुसुन एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टिकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
बोटावरची साई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतथी दक्षता बापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नौर पेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत.
मतदाताच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०११ रोजी आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी, तसेच नखाबर आणि नखाच्या बरच्या बाजुला त्वचेवर तीन-चार वेळा घासून शाई लावाची, अशा सूचना पापूर्वीदेखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.