Thursday, October 24, 2024

उत्तरप्रदेशात मदरशामध्ये नकली नोटांची छपाई; मौलवीसह 4 आरोपींना अटक

Share

उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे नकली नोटांचा कारखाना मिळाला आहे. मदरशातील एका खोली सुरू असलेल्या या कारखान्यात भारतीय चलनांच्या नोटांची छपाई सुरू होती. याप्रकरणी पोलिसांनी मौलवीसह चौघांना अटक केली आहे.

प्रयागराजच्या सिव्हील लाईन्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात नकली नोटा छापल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर याचे धागेदोरे एका मदरशापर्यंत आले. सर्व पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी मदरशामध्ये छापा टाकला. त्यावेळी एका खोलीत नोटांची छापाई सुरु होती. त्या ठिकाणावरुन स्कॅनर, प्रिंटिंग मशीन आणि बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी मदरशाचा प्राचार्य मौलवी मोहम्मद तफसीरुल आरीफीनसह मोहम्मद अफजल, मोहम्मद साहिद आणि मास्टर माइंड जहीरखान उर्फ अब्दुल जाहीर यांना अटक करण्यात आली आहे. या मदरशात गेल्या 3 महिन्यांपासून नकली नोटा छापण्याचा कारखाना सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीत मौलवी मोहम्मद तफसीरूल हा ओडिशाचा रहिवाशी आहे. या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

दरम्यान नकली नोटाच्या या रॅकेटचा संबंध आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनांसोबत असण्याची शक्यता आहे. आरोपींच्या फोनच्या ब्राउजिंग हिस्ट्रीमध्ये महाकुंभसंदर्भात लिंक मिळाले आहेत. प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभात नकली नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आणण्याची तयारी आरोपींनी केली होती.

अन्य लेख

संबंधित लेख