Friday, September 13, 2024

घाटकोपर होर्डिंग: चीड आणणारे चित्र..; उद्धव ठाकरे-भावेश भिडेंचा फोटो ट्विट करत भाजप नेत्याचा सवाल

Share

मुंबई : मुंबईत (Mumbai) काल (१३ मे) एक मोठी दुर्घटना घडली. घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू (घाटकोपर होर्डिंग Ghatkopar Hoarding Collapse) झाला आहे. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपांचा राजकारण रंगलं आहे. हे होर्डिंग ज्या कंपनीच होतं, त्याच्या मालकाविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलाय. भावेश भिंडे असं या होर्डिंग कंपनीच्या मालकाच नाव आहे. आता त्याचा उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन आता सत्ताधारी पक्षाचे घाटकोपर पश्चिम (Ghatkopar West) विधानसभेचे भाजपचे (BJP) आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी त्यांच्या X अकाउंटवर भिडेंसोबतचा फोटो ट्विट करत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) प्रश्न विचारला आहे.

राम कदम यांनी त्यांच्या X अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि भावेश भिडे यांच्या भेटीचा तो फोटो असल्याचं दिसत आहे. राम कदम यांनी हा उद्धव ठाकरे आणि भावेश भिडे यांचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, १४ लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार असणारा हाच तो भावेश भिडे आहे. तो श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात असल्याचा त्यांनी अप्रत्यक्ष उल्लेख केला आहे. मनाला चीड आणणारे चित्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

त्या अनधिकृत होर्डिंगला  संरक्षण कोणाचे  होते? असा प्रश्नही राम कदम यांनी त्यांच्या पोस्टमधून केला आहे. हे या चित्रावरून स्पष्ट होतं, असंही कदम म्हणाले आहेत. टक्केवारीसाठी कोरोना काळातील खिचडी चोर, कफनचोर अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. आज टक्केवारीसाठी निष्पाप १४ लोकांचे नाहक बळी घेतल्याची टीका त्यांनी केली आहे. हे पाप कुठे फेडणार असा सवाल त्यांनी विचारला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख