Sunday, October 13, 2024

शरद पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला; गोपीचंद पडळकरांची टीका

Share

मुंबई : सध्या राज्यभरात आगामी होणाऱ्या विधानसभेचं वार वाहत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर वार-पलटवार होत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. यावरून आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले कि, शरद पवारांमुळे (Sharad Pawar) राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला आहे. छत्रपती शिवाजी महाजांनी दिलेली तेजाची झळाली शरद पवारांमुळे हरवली आहे, अशी टीका केली आहे.

पडळकर म्हणाले, मी शरद पवारांच्या अर्ध्या वक्तव्याशी सहमत आहे. महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची जी आवश्यकता होती, ती देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केली आहे. शरद पवारांमुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सर झालाय. 50-60 वर्षे पवारांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता होती. त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचंचं काम केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी पवारांमुळं हरवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षीत असणारा महाराष्ट्र जो 18 पगड जातींचा आणि 12 बलुतेदारांचा तो 50 वर्ष पवारांनी स्वत:ची प्रायव्हेट कंपनी म्हणून वापरल. आधी फक्त पवार प्रायव्हेट कंपनी होती आता पवार आणि सुळे प्रायव्हेट कंपनी असा झाला आहे.

जातीजातीमध्ये वाद लावायचा, महाराष्ट्रात वातावरण अशांत ठेवायचं आण प्रस्थापितांची घरे भरण्याचे काम पवारांनी केले आहे. याला कंटाळून महाराष्ट्रातील लोकांनी 2014 साली परिवर्तन केला. पवारांचा जो शासनकाळ होता तो काळाकुट्ट होता. शरद पवारांनी भ्रष्टाचार, जातीवाद केला. लोकांमध्ये भांडण लावली. आता मला त्यांनी विनंती करायची आहे की, निवांत राहा, हरीनामाचा जप करा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये पुण्य काम करण्याची इच्छा जागृत होईल, असेही पडळकर म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख