Tuesday, September 17, 2024

आपलं हिंदू राष्ट्र वाढलं पाहिजे; ऑलिम्पिक मेडल विजेत्या स्वप्नील कुसाळेचं भाष्य

Share

नेमबाज स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) याने मोठे वक्तव्य केले आहे. आपलं हिंदू राष्ट्र पुढे गेलं पाहिजे. ते वाढलं पाहिजे अस आवाहन ऑलम्पिक कांस्यपदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांनी केलं आहे. तो बालेवाडी- हिंजवडीतील अमोल बालवडकर यांच्या दहीहंडीत प्रसारमाध्यमांशी बोलत होता. यावेळी त्यांनी तरुणांच्या डायट विषयी देखील आवर्जून उल्लेख करत घरातील आणि पौष्टिक जेवण करण्याच आवाहन तरुणांना केल आहे.

स्वप्नील कुसाळे म्हणाले कि, “पहिल्यांदाच दहीहंडी उत्सवात सहभागी झालो आहे. आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे. आपण सर्वजण जय श्रीराम म्हणतो, घोषणाबाजी करतो. त्या पुढे गेल्या पाहिजेत. हिंदू संस्कृती वाढली पाहिजे. आपण लहान मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, म्हणजे आपले हिंदू राष्ट्र आणखी मोठे होईल.”

अन्य लेख

संबंधित लेख