Tuesday, September 17, 2024

लाडकी बहीण योजना – लाभार्थींच्या खात्यातून कोणतीही रक्कम कपात न करण्याचे निर्देश

Share


राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै व ऑगस्ट 2024 या दोन महिन्यांचे प्रत्येकी 3 हजार रुपये डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या जमा झालेल्या रक्कमेतून बँकांनी कोणत्याही प्रकारची रक्कम कपात करु नये, असे निर्देश ठिकठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

राज्यातील महिला व मुलींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 जुलै पासून सुरु करण्यात आली आहे. पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन महिन्यांची रक्कम जमा झाली असून बँकेमार्फत जमा झालेल्या रक्कमेतून बँकेची कर्ज, बँक शुल्क व इतर रक्कमेची कपात करण्यात येत असल्याचे निर्देशनास आले आहे.

त्याचप्रमाणे ज्या महिला लाभार्थ्यांचे बँक खात्यातून अशी रक्कम कपात झाली असल्यास त्यांनी त्याची माहिती संबंधित तालुक्याचे तहसिलदार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी तर महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त द्यावी असं सांगण्यात आलं आहे.

अन्य लेख

संबंधित लेख