Thursday, December 4, 2025

राज्य विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर दरम्यान; ‘शनिवार-रविवार’ही सभागृहाचे कामकाज सुरू राहणार

Share

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ ते रविवार १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूरमध्ये होणार आहे. १३ डिसेंबर शनिवार आणि १४ डिसेंबर रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानभवन, मुंबई येथे पार पडलेल्या या बैठकीला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रवीण दरेकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या ऐतिहासिक पर्वानिमित्त २६ मार्च २०२५ रोजी विधानसभेत चर्चा झाली होती. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचे पुस्तक स्वरूपातील संकलन महाराष्ट्र विधिमंडळ वि.स. पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या पुढाकारातून करण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार, ९ डिसेंबर २०२५ रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

‘भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल’ या ऐतिहासिक पर्वानिमित्त दि. २६ मार्च २०२५ रोजी विधानसभेत ‘भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल’ या विषयावर सभागृहात चर्चा झाली होती. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचे पुस्तक स्वरूपातील संकलन महाराष्ट्र विधिमंडळ ‘वि.स. पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्रा’च्या पुढाकारातून करण्यात आले आहे. दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख