मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर पहाणीसाठी पोहोचलेले आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या कार्यकर्तांमध्ये तुफान राडा झाल्याचं चित्र बुधवारी पाहायला मिळालं. महाविकास आघाडीने मालवणमध्ये धडक मोर्चाची घोषणा केली होती. या मोर्चासाठी मालवणमध्ये पोहोचलेल्या आदित्य ठाकरेंनी ज्यावेळी किल्ल्याला भेट दिली त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, निलेश राणे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते पहाणीसाठी आले होते. त्यामुळे यावेळी ठाकरे आणि राणे यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. पोलिसांनी यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखलं. मात्र काही वेळाने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पुन्हा एकदा भिडले. राड्यानंतर माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एक्स हॅण्डलवर पोस्ट करत पुन्हा डिवचलं आहे.
“ठाकरे यांची खरी लायकी महाराष्ट्राला कळली. एक ठाकरे एक आमदार एक विरोधी पक्ष नेता एक माजी खासदार असून सुद्धा हतबल झाले, “अडीच तास लपून बसावं लागलं. उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या) कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांसमोर मार खाल्ला. मैदान सोडून एका बाजूने सटकावं लागलं,” असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.
“हा ट्रेलर होता अर्धा तास अजून थांबला असता तर पूरा पिक्चर दाखवला असता,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तर पोस्टच्या शेवटी, “आदित्यसारखा घाबरट मी बघितला नाही,” असं म्हणत थेट आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं.
- सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी
- पॅरिस पॅरालिम्पिक 2024 : होकातो होतोझे सेमाने शॉटपुटमध्ये जिंकले कांस्यपदक
- गणेशोत्सवात पुणे महामेट्रो कडून आनंदाची बातमी; आता मेट्रोच्या वेळा अन् फेऱ्याही वाढवल्या
- प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी T64 फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकले
- पण…, तो डाव दाखविण्याची वेळ येऊ नये; अजित पवारांची भाग्यश्री आत्राम यांना सज्जड दम