Tuesday, March 10, 2026

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘पीएम किसान’चा २२ वा हप्ता या दिवशी जमा होणार; पाहा तारीख आणि लाभार्थी यादी

Share

नवी दिल्ली : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २२ व्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर झाली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १३ मार्च २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये जमा केले जाणार आहेत.

‘पीएम किसान’च्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी वितरित करण्यात आला होता. त्यानंतर पुढील हप्ता फेब्रुवारीमध्ये येणे अपेक्षित होते, मात्र काही कारणास्तव त्याला विलंब झाला. होळीच्या मुहूर्तावर पैसे मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना होती, मात्र आता १३ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही नियम केले आहेत. २२ व्या हप्त्याचे पैसे खात्यात येण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे आणि फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केलेले नाही, त्यांचा हप्ता रखडू शकतो.

तुमचे नाव यादीत कसे तपासायचे?
तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही, हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

१. अधिकृत वेबसाइट: प्रथम pmkisan.gov.in या पोर्टलला भेट द्या.
२. Beneficiary List: होम पेजवर ‘Beneficiary List’ या पर्यायावर क्लिक करा.
३. तपशील भरा: तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
४. Get Report: ‘Get Report’ वर क्लिक करताच तुमच्या गावातील लाभार्थ्यांची यादी दिसेल, ज्यात तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

हप्त्याची स्थिती (Status) कशी पाहाल?
पोर्टलवरील ‘Know Your Status’ पर्यायावर क्लिक करा.

तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि कॅप्चा कोड टाका.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी (OTP) येईल, तो प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला हप्त्याविषयी सविस्तर माहिती मिळेल.

२० व्या हप्त्यावेळी अपात्रतेमुळे ३० लाखांहून अधिक नावे यादीतून हटवण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली स्थिती ऑनलाइन तपासून घेणे फायद्याचे ठरेल.

अन्य लेख

संबंधित लेख