Saturday, July 27, 2024

पहिल्या टप्प्यात देशभरात भाजप-एनडीएच्या बाजूने एकतर्फी मतदान – नरेंद्र मोदी

Share

नांदेड : प्रताप पाटील चिखलीकर आणि बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नांदेडमध्ये (Nanded) सभा घेत आहेत. यावेळी बोलतांना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरात भाजप-एनडीएच्या (BJP – NDA) बाजूने एकतर्फी मतदान झाले आहे. एनडीए ४ जूनला ऐतिहासिक विजय नोंदवणार आहे. यावेळी जमलेल्या मतदारांशी बोलताना मोदींनी सर्वांना रामराम म्हणत मराठीतून सुरूवात केली. नांदेड आणि हिंगोलीकरांना माझा नमस्कार, २६ एप्रिल ची तयारी झाली ना? म्हणत मराठीतून प्रश्न सुद्धा केला. तसेच, मराठवाड्याचा विकास करणे ही मोदी यांची गॅरंटी आहे, असेही नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या प्रचार सभेत सांगितले.

“इंडिया आघाडीचे लोक आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी एकत्र आले आहेत, हे लोकांनाही समजत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच मतदारांनी इंडिया आघाडीला नाकारले. या निवडणुकीत विरोधकांना उमेदवार मिळत नाहीत. देशातील २५ टक्के जागांवर इंडिया आघाडीचे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. जे लोक स्वतःच्या आघाडीवर विश्वास ठेवत नाहीत, अशा लोकांवर देश विश्वास ठेवू शकतो का? ही लोक एकत्र लढवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशा लोकांना लोकसभेत स्थान दिले तर तिथेही ते लोक एकमेकांविरोधात संघर्ष करतील. ४ जूननंतर इंडिया आघाडीचे नेते एकमेकांचे कपडे फाडतील”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.

अन्य लेख

संबंधित लेख