Saturday, March 15, 2025

रायगड स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे मनोगत

Share

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बोलतं आहे. हे माझे मनोगत आहे. सध्या वादासाठी कोणताही विषय चालतो. माझ जीर्ण शिर्ण अस्तित्व कोणी शोधल असाही विषय वादग्रस्त बनवता येतो. पण या वादात मला काय सांगायचे आहे हे विसरायला नको म्हणून हा खटाटोप.

तंजावरचे मराठे हे का आठवायचे? का शिवाजी महाराजांचा आग्र्याहून परत येतानाचा मथुरेचा मुक्काम आठवायचा? का राज्याभिषेक आठवायचा? का सप्तसिंधुंचे शिवाजी महाराज राज्याभिषेकातील स्नान आठवायचे? का संस्कृत भाषेतील राज्यकोष आठवायचा?

कारण यातील प्रत्येक गोष्ट सांगते की माझ्या राजाने हा स्वराज्य निर्मितीचा ध्यास का घेतला होता.? तो स्व कोण होता? ते काशी विश्वनाथाचे मंदीर औरंग्याने तोडल्यावर शिव छत्रपती संतप्त का झाले होते? कारण शिवाजी महाराजांना एका जातीचे नाही तर हिंदवी स्वराज्य स्थापायचे होते? सप्त नद्या मुक्त करायच्या होत्या. संपूर्ण सांस्कृतिक भारत माता त्यांच्या डोळ्यासमोर होती. आठरा पगड जातीतील हिंदू समाज त्यांची प्रजा होता. या संस्कृतीचे आपले कोण परके कोण याचे भान होते.

आग्र्याहून निसटले पण सुखरूप रायगडी कसे आले हे आठवा? मी रायगडी जे पार्थिव धारण केले ते पर मुलखातून या रायगडी कसे पोहचले? याच उत्तर शोधा व राजांच्या सांस्कृतिक एकात्म भारताची कल्पना काय होती हे कोडे उलगडेल. १०००/१२०० मैलाच्या प्रवासात त्यांना कोणीही ओळखले नाही? कसे ओळखणार? प्रवासातील सर्व हिंदूंना माहिती असलेल्या, आपले वाटणा-या भगव्या साधुंच्या वेषात होते. औरंग्या काशी विश्वनाथ फोडतो म्हणून शत्रू तर पूजा करतात म्हणून राजे आमचे हे उत्तरेतील हिंदूंना समजत होते. मथुरेत संभाजी महाराज राहिले हिंदू घरात. प्रत्यक्ष आगीशी खेळ. पण मथुरेतील हिंदू ते खेळले कारण सांस्कृतिक भारताच्या राजाच्या वारसाचे रक्षण करायचे होते. हे शिवराय आठवा हे माझं सांगणं आहे.

तीच गोष्ट तंजावरची. आपले सावत्र भाऊ व्यंकोजींना सल्ला दिला की आम्ही येथे तुर्कांशी लढत आहोत व तुम्ही त्यांना साथ देता? त्यांना स्व चे भान दिलं व नंतरच्या काळात हे तंजावर हिंदु राष्ट्राचे तारण ठरले. भारतात कोणीही हिंदू परका नाही व जो देवावर, मंदीरावर घण उचलेल तो देशाचा नाही हा भाव जागरण म्हणजे तंजावरचे मराठे हे मला तुम्हाला ठासून सांगायचे आहे. अर्वाचीन भारतातील सर्वात मोठा राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून केलेल राज्य निर्माण म्हणजे शिवाजी महाराज व या परिप्रेक्षातून बघा तंजावरचे मराठे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन महत्त्वाचे आदर्श आपल्या राज्यकर्त्यांना दिले. १ हिंदू धर्म ही स्वराज्याची पूर्व अट आहे व २ राज्याच्या सिमा संस्कृती तयार करते. यातील पहिला सल्ला पराकोटीच्या टोकाला नेऊन आदर्श निर्माण केला पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी. हिंदू धर्म रक्षणासाठी जीवनदान व अनंत यातना भोगल्या. व दुसरा सल्ला व्यवहारात आणला बाजीराव पेशव्यांनी. संपूर्ण सांस्कृतिक भारत हे एक राष्ट्र मानले व बुंदेलखंडाला मदत केली.

मला जिर्ण शीर्ण अवस्थेत कोणीही शोधल असू दे लक्षात ठेवा माझे मनोगत. जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मनोगत आहे, सल्ला आहे व सार्वभौम राजे असल्याने आदेश आहे.

तंजावरचे मराठे म्हणून स्मरणात ठेवू यात.

सुनील देशपांडे

अन्य लेख

संबंधित लेख