डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त “दस्तुर-ए-हिंद का मेमार : डॉ. भीमराव आंबेडकर” हे पुस्तक मुलांकडून वाचून घेण्याचा उपक्रम राबवण्यात येत असल्याचा गाजावाजा होत असला, तरी या उपक्रमामागील वास्तवावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वाचन संस्कृती वाढवण्याच्या नावाखाली केवळ मुस्लिम लेखकाने लिहिलेली पुस्तक वाचनाचा कार्यक्रम राबवला जात आहे. पण स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लिहिलेले साहित्य वाचनास द्यायला काय हरकत होती.
सदर उपक्रमात “४० मोहल्ला बाल वाचनालय” सहभागी असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात एकदाच कार्यक्रम करून फोटोसेशन घेणे आणि प्रसिद्धी मिळवणे, एवढ्यावरच हा उपक्रम मर्यादित राहतो का? असा सवाल उपस्थित होत आहे.
एकाच धर्माच्या विद्यार्थ्यांना वाचनालय उपक्रमास बोलवुन काय संदेश आयोजकांना द्यायचा आहे? सर्व भारतीयाच्या हिताचा जीवनभर विचार करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशीच त्यांच्या प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय या विचाराला हरताळ फासला जात आहे.
एकंदरीत, सामाजिक जाणीव वाढवण्याच्या नावाखाली केवळ दिखावा न करता, प्रत्यक्षात मुलांच्या बौद्धिक विकासासाठी ठोस आणि सातत्यपूर्ण प्रयत्न होणे गरजेचे आहे. अन्यथा असे उपक्रम केवळ प्रसिद्धीपुरते मर्यादित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.