Sunday, October 13, 2024

“…ही बाळासाहेब ठाकरे यांची खानदान होऊ शकत नाही,“ शिंदे गटाच्या नेत्याची घणाघाती टीका

Share

महाराष्ट्र : “आदित्य ठाकरे बेईमान आहेत. ही बाळासाहेब ठाकरे यांची खानदान होऊ शकत नाही. राजकारणातून आमचं खानदान उद्धवस्त करण्याचे काम उद्धव ठाकरे करत होते आपल्याच आमदाराला संपवणारा जगातील पहिला नेता म्हणजे उद्धव ठाकरे” अशी घणाघाती टीका शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केले आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी खेडमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Aditya Thackeray and Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “शिवसेना आम्ही मोठी केली. कालचं पिल्लू याला काय माहिती”, असा टोला रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी मधील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहेत. रामदास कदम म्हणाले कि, “आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याला एका कवडीची पण किंमत देत नाही. आदित्य ठाकरे यांचं योगदान काय आहे. शिवसेना आम्ही मोठी केली. कोकणी माणसाने शिवसेना मोठी केली. कालच पिल्लू याला काय माहिती”, अशा शब्दात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.

पुढे ते म्हणाले, “आदित्य ठाकरे बेईमान आहेत. ही बाळासाहेब ठाकरे यांची खानदान होऊ शकत नाही. राजकारणातून आमचं खानदान उद्धवस्त करण्याचे काम उद्धव ठाकरे करत होते. आपल्याच आमदाराला संपवणारा जगातील पहिला नेता म्हणजे उद्धव ठाकरे. जर त्यांच्यात हिंमत असेल तर आदित्य काय त्याच्या बापाने उद्धवने दापोलीतून उभे राहून दाखवावे”, असे चॅलेंज रामदास कदम यांनी दिले.

“नारायण राणे जेव्हा पक्षातून बाहेर पडले. तेव्हा हाच उद्धव ठाकरे मला पुढच्या सीटवर बसवल्याशिवाय मातोश्रीवरुन बाहेर पडत नव्हता. ज्या सापाला दूध पाजलं तो अंगावर येतोय, त्याचा फणा कसा ठेचायचा हे मला चांगलं माहिती आहे. तुम्ही कुणाच्या अंगावर येताय याचं भान ठेवा”, असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख