Saturday, January 10, 2026

“मुंह में फुले शाहू आंबेडकर… बगल में मुल्ला मौलवी”

Share

बातमी अकोल्याची आहे. २ जानेवारी हा महापालिकेसाठी नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अकोल्यातील प्रभाग क्रमांक १६ मधील ओबीसी महिला राखीव प्रभागातील जागेवर MIM कडून जमीन बी शेख रफिक या उमेदवार होत्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमरीन सदाफ सय्यद नाजीम उमेदवार होत्या. या दोघीही मुस्लिम समाजातून असल्याने त्यांच्यातील मत विभाजनातून दुसऱ्या समाजाचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मुस्लिम समाजाची एक बैठक झाली. अकोल्यातील खदान भागातील एका मशिदीमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना आणि कुटुंबियांना बोलवण्यात आलं. यावेळी “ईश्वरचिठ्ठी”त ज्याचं नाव निघेल त्याला माघार घ्यावी लागेल असा निर्णय झाला. ईश्वरचिठ्ठीत MIM च्या उमेदवार शमीम बी शेख रफिक यांचं नाव निघालं. त्यानंतर त्यांनी प्रभाग क्रमांक १६ मधील ओबीसी महिला राखीव प्रभागातून आपलं नामांकन अर्ज परत घेतला.

http://twitter.com/abpmajhatv/status/187506927376579803

ही बातमी मुसलमान समाजाची “जिहादी” मानसिकता. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची “फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र” ही विचारधारा किती ढोंगी आणि तकलादू आहे हे अधोरेखित करणारी आहे.

पहिले म्हणजे, मुसलमान समाजाला आपल्या धर्मापुढे(दीनधर्म) कोणतीही राजकीय विचारधारा गौण वाटते. वाट्टेल त्या परिस्थितीत कोणत्याही राजकीय पक्षाचा हिंदू उमेदवार निवडून येता कामा नये. मुसलमान उमेदवारच निवडून आला पाहिजे. असा त्याचा अट्टाहास असतो. अगदी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुसलमान समर्थकाला देखील असेच वाटते. त्यासाठी तो रझाकारी मनोवृतीच्या MIM चे समर्थन घ्यायला किंवा त्यांचे समर्थन घ्यायला तयार होतो.

आश्चर्य म्हणजे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून उठता बसता डांगोरा पिटणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या खदानमधील मशिदीतील “ईश्वरचिठ्ठी”च्या तमाशात हिरीरीने सहभाग घेतला. “ईश्वर कृपे”ने शरद पवारांच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावाची लॉटरी फुटल्यामुळे आता तो MIMचा न लाजता पाठिंबा घेणार आहे. हीच लॉटरी जर MIM च्या उमेदवाराला लागली असती तर? शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने MIMच्या उमेदवाराला न लाजता पाठिंबा दिला असता आणि आश्चर्य म्हणजे मशिदीत जी चिट्ठी काढावी लागली त्याला नाव दिले “ईश्वरचिठ्ठी”. ईश्वराची लीला खरंच अगाध आहे.

दुसरे म्हणजे, समजा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रभागात हिंदू उमेदवार दिला असता तर त्या पक्षाच्या येथील मुसलमान मतदारांनी अंदरखानी MIM च्या मुसलमान उमेदवाराला मते दिली असती असाच होतो. “धर्म सर्वोपरी” अशी ही मुसलमान समाजाची घृणास्पद जिहादी मानसिकता संसदीय लोकशाहीची मारेकरी आहे.

त्यातूनही राजकीय समझोता करायचाच होता तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकोला जिल्ह्याच्या अध्यक्ष्यांनी MIMच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन, एखाद्या हॉटेलमध्ये त्यांना बोलावून, आपल्या किंवा त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्यांच्या घरी हाच समझोता करता आला असता. हा समझोता बेशरमपणाचा असला तरी राजशिष्टाचाराला धरून झाला असता. पण त्यांनी तो मुल्ला मौलवींच्या सांगण्यावरून त्यांच्या उपस्थितीत मशिदीत केला. उद्या सकल हिंदू समाजाने कोणत्याही परिस्थितीत मुसलमान उमेदवार निवडून येऊ नये. हिंदूच उमेदवार निवडून यावा म्हणून देवळात चिठ्ठ्या टाकायला सुरुवात केली तर मुसलमान समाजाने आणि शरद पवारांच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने “संविधान खतरेमें” ची रडारड अजिबात करू नये. त्यांनी तो नैतिक अधिकार गमावलेला आहे.

मशिदीत काढलेल्या या ईश्वरचिठ्ठीने आयुष्यभर “राजकारणात धर्म आणू नका” म्हणून ज्ञानामृत पाजणाऱ्या उठता बसता “फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र” म्हणून डांगोरा पिटणाऱ्या, सर्वधर्मसमभाव आणि “संविधान बचाव”ची जपमाळ ओढणाऱ्या शरद पवारांच्या राजकीय ढोंगीपणाच्या अब्रूची लक्तरे अक्षरशः वेशीवर टांगली गेली आहेत. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामतीच्या गोविंद बागेतून चालवला जातो की अकोल्याच्या खदान मशिदीतून?

गेल्या दशकभरात महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तंगत होत चाललेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातील एका महानगरपालिकेच्या एका प्रभागातला एक नगरसेवक निवडून आणण्यासाठी MIM आणि मशिदीतल्या मुला-मौलवींपुढे लोटांगण घालावे लागते. यातच त्यांच्या शुल्लक राजकीय कुवतीची आणि औकातीची साक्ष पटते. तीन तलाक हा कुराणाचा आदेश आहे म्हणून सांगणाऱ्या शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीची आजची शोकांतिका “मुंह में फुले शाहू आंबेडकर… बगल में मुल्ला मौलवी” ही आहे.

अन्य लेख

संबंधित लेख