Friday, October 18, 2024

श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजना

Share

65 वर्षावरील निराधार वयोवृद्ध व्यक्तींना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणली आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थी वृद्ध व्यक्तीला दरमहा 1500 रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. दारिद्र रेषेखालील 65 वर्षावरील वृद्ध व्यक्तींना आर्थिक सहाय्य करण्याचे काम या योजनेतून केले जाणार आहे.

या श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजनेची पात्रता:-

1)वृद्ध व्यक्ती ही किमान 15 वर्षापासून महाराष्ट्रात रहिवासी असावी

2)व्यक्तीचे वय किमान 65 वर्ष असावे

3) त्याचे वार्षिक उत्पन्न 21 हजारांपेक्षा कमी असावे

आवश्यक असलेल्या कागदपत्रे :-

1)वयाचा दाखला

2)उत्पन्नाचा दाखला

3)आधार कार्ड रेशन कार्ड ची झेरॉक्स

4)रहिवासी दाखला

5)बँक पासबुक झेरॉक्स

6)अर्जदाराचे फोटो

अर्ज कुठे कराल:-

तहसील कार्यालय

सेतू केंद्र

अन्य लेख

संबंधित लेख