Thursday, December 4, 2025

CM रेवंथ रेड्डींचे ‘ते’ बोल ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! कोटी हिंदूंच्या भावना दुखावल्या

Share

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी हिंदू देवी-देवतांबद्दल केलेल्या वादग्रस्त आणि निंदनीय टिप्पणीमुळे देशात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी हैदराबाद येथील काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी ‘हिंदुत्वाचा अपमान करणारी’ गरळ ओकल्याचा आरोप भाजपने केला आहे.

रेड्डी यांचे आक्षेपार्ह विधान

काँग्रेस पक्षातील विविध विचारधारेचे समर्थन करताना मुख्यमंत्री रेड्डी यांनी हिंदू धर्मातील देव-देवतांची तुलना केली, रेड्डी म्हणाले, “हिंदू धर्मात जे अविवाहित आहेत, त्यांच्यासाठी भगवान हनुमान आहेत. जे दोनदा लग्न करतात, त्यांचे वेगळे देव आहेत. जे दारू पितात, त्यांच्यासाठी आणखी एक देव आहे. येल्लम्मा, पोचम्मा, मैसम्मा. कोंबडी खाणाऱ्या लोकांसाठी वेगळे देव आहेत आणि डाळ-भात खाणाऱ्यांसाठी आणखी एक देव आहे.”

या विधानामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, विरोधकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.

‘काँग्रेसचा हिंदुद्वेष उघड झाला’ – भाजपचा हल्लाबोल

या टिप्पणीवर भाजप नेत्यांनी अत्यंत कठोर प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी एक्स वर पोस्ट करत काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. संजय कुमार म्हणाले, “काँग्रेसला हिंदूंबद्दल तीव्र द्वेष आहे.” “मुख्यमंत्री रेड्डी यांनी केलेले हे विधानच काँग्रेसची विचारसरणी स्पष्टपणे दर्शवते.” “काँग्रेस नेहमीच AIMIM समोर झुकणारा पक्ष राहिला आहे. मुख्यमंत्री रेड्डींची ही टिप्पणी सिद्ध करते की काँग्रेस हिंदू समाजाला लाजवत आहे.” बंदी संजय कुमार यांनी रेड्डी यांच्या जुन्या विधानाचाही संदर्भ दिला. ५ नोव्हेंबर रोजी जुबली हिल्स पोटनिवडणुकीच्या वेळी रेड्डी म्हणाले होते: “काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस.” हे विधानच त्यांची खरी धर्मनिरपेक्षता दाखवते, असे भाजपचे म्हणणे आहे.

भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी संपूर्ण हिंदू समाजाची त्वरित माफी मागावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख