Monday, December 2, 2024

‘पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन तीला साताऱ्यातून निवडून आणेन”

Share

बीड :  ‘पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन तीला साताऱ्यातून निवडून आणेन”, असं वक्तव्य भाजपचे नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज जाहीर सभेत केलं. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. बीड लोकसभा मतदारसंघाच्या (Beed Lok Sabha Election) महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बीडमध्ये उदयनराजे भोसले यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

“मी मनापासून सांगतो पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही, तिला जर निवडून दिलं नाही, तर मी राजीनामा देईल आणि पंकजाला माझ्या तिथून निवडून आणेन हे लक्षात ठेवा. पण तसं होत नाही. मी येतांना बघत होतो. चोहोबाजूंनी कंपाऊंडला कुलूप लावतो. हो म्हणालात तर सोडतो. नाहीतर नाही सोडत.’, असं म्हणत उदयनराजेंनी बीडकरांना पंकजा मुंडेंना मतदान करण्याचे आवाहन केलं.

‘एका जीवाभावाच्या व्यक्तीला मदत करायची की नाही. तिला संधी मिळाली पाहिजे की नाही? ती काळ्याची पांढरी झाल्यानंतर तिला संधी मिळणार का?’, असा सवाल उदयनराजे यांनी बीडकरांना केला. तसंच, ‘एक सांगतो कृपा करा, माझ्या बहिणीला निवडून द्या. तलवार उपसा आता. मी आलो तिच्याकरता नीट वागा. आता वाकून नमस्कार करतो तुम्हाला. तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय.’ असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंढेंच्या आठवणींना उजाळा दिला, “ फक्त एवढच लक्षात ठेवा, मी काल पण तुमचा होतो, पंकजा काय वेगळा नाही. आमचे वडील वारल्यानंतर कोण न्हवत आमचं बोट धरायला त्यावेळेस गोपीनाथ मुंढेंनी बोट धरलं”,  असं म्हणत उदयनराजेंनी पंकजा मुंडेंसाठी जनतेसमोर भावनिक साद घातली. 

अन्य लेख

संबंधित लेख