Saturday, December 6, 2025

‘१५०+ जागा जिंकणार, मुंबईकरच ताबा घेणार!’ अमित साटम यांचा महापालिकेत ‘मास्टर प्लॅन’; Uddhav Thackeray यांना थेट मैदानातून ‘अल्टिमेटम’!

Share

मुंबई, मालाड: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते आणि आमदार अमित साटम (Ameet Satam) यांनी आज मालाड, प्रभाग क्रमांक ४७ येथे निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी जोरदार भाषण करत मुंबईतील (Mumbai) विकासाचे श्रेय घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर थेट हल्ला चढवला.

महापालिकेत ‘महायुती’चाच महापौर! १५०+ चा विश्वास

“महायुतीच्या माध्यमातून आम्ही मुंबई महानगरपालिकेत १५० हून अधिक जागा जिंकणार आणि महायुतीचाच महापौर निवडून येईल,” असा स्पष्ट विश्वास आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला. त्यांनी नमूद केले की, मुंबईकरांमध्ये महापालिकेच्या निवडणुकीबद्दल मोठी उत्सुकता असून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.

फडणवीस-शिंदे यांचे ‘ते’ ऐतिहासिक प्रकल्प साटम यांनी मांडले!

अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करताना विरोधकांची मोट किती मजबूत आहे, यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मुंबईकरांसाठी काम कोणी केले, हे पाहिले पाहिजे, असे ठामपणे सांगितले.

साटम यांचे ‘ते’ थेट प्रश्न:

  • “गेल्या ११ वर्षांत मुंबई शहराचा विकास कोणी केला?”
  • “या शहरात मेट्रो कोणी आणली?”
  • अटल सेतू कोणी केला?”
  • कोस्टल रोड कोणी केला?”
  • बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला ५६० फुटांचे घर कोणी दिले?”

‘ही एका परिवाराची जहागीर नाही!’ साटम यांचा ‘फायर’ इशारा

अमित साटम यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना अत्यंत मोठे विधान केले. “मुंबई महानगरपालिका ही कोणत्याही एका परिवाराची जहागीर नसून ती मुंबईकरांची आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. “येत्या काळात मुंबईकरच तिचा ताबा घेतील,” असा ‘फायर’ इशारा देत साटम यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचा दावा केला.

अन्य लेख

संबंधित लेख