Saturday, December 27, 2025

“जो हिंदू हित की बात करेगा, वही…;” मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा हुंकार

Share

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2025) रणधुमाळीत आता हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली असली तरी, भारतीय जनता पक्षाने आपली ‘राष्ट्र प्रथम’ आणि ‘हिंदू हित’ ही विचारधारा अधिक आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली आहे. मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नसून ती हिंदुत्वाची आणि मराठी अस्मितेची जन्मभूमी आहे. याच अस्मितेच्या रक्षणासाठी आणि मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी भाजप आता मैदानात उतरली आहे. भाजपचे आक्रमक नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी याच संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे ट्विट करून विरोधकांना ललकारले आहे.

नितेश राणे यांचे ट्विट:

जो हिन्दू हित की बात करेगा..

वही “आमची मुंबई” पर राज करेगा !!

खऱ्या हिंदुत्वासाठी मुंबईकरांची एकजूट

नितेश राणे यांच्या या ट्विटमुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उबाठा गटाने आपल्या सत्तेच्या काळात ज्या प्रकारे ठराविक वर्गाचे लांगूलचालन केले आणि हिंदुत्वाच्या मूळ मुद्द्याला बगल दिली, त्याला चोख उत्तर देण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे. मुंबईच्या गल्लीबोळातून आता हाच सूर उमटत आहे की, ज्यांना हिंदू संस्कृतीचा आणि सणांचा आदर आहे, त्यांच्याच हाती मुंबईची सूत्रे सुरक्षित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि देवेंद्र फडणवीस यांचे नियोजन यामुळे मुंबईच्या विकासकामां सोबतीलाच सांस्कृतिक वारसा जपण्याचा संकल्प महायुतीने केला आहे. ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्याची नसून, मुंबईच्या ‘डीएनए’मध्ये असलेल्या हिंदुत्वाच्या रक्षणाची आहे, हेच नितेश राणेंच्या ट्विटमधून अधोरेखित होत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख