Wednesday, August 26, 2026

राज्य सीईटीचा भारतीय नर्सिंग कौन्सिलकडे विनंती अर्ज 

Share

राज्यात बीएससी नर्सिंग च्या पाच हजाराहून अधिक जागा रिक्त राहत असल्याने शून्य पर्सेंटाईलचा निकष बीएससी नर्सिंगच्या प्रवेशासाठी यावर्षीही घेण्याची तयारी सुरू आहे. राज्यात बीएससी नर्सिंग साठी ५० पर्सेंटाइलची जी अट आहे ती शिथिल करण्यात यावी. यासाठी राज्य सीईटी ने केंद्रातील भारतीय नर्सिंग परिषदेला महिना भर पूर्वी विनंती अर्ज केला होता. 

गेल्या वर्षी राज्यभरातील नर्सिंगच्या रिक्त जागांची संख्या ५५७३ एवढी होती. सीईटी मध्ये किमान ५० पर्सेंटाइलची अट असल्याकारणाने, तेव्हा प्रवेशाच्या शेवटच्या फेरीनंतर रिकामी असलेल्या जागांची संख्या मोठी होती. राज्य सिइटी कक्षाने या प्रकरणात विशेष लक्ष देऊन भारतीय नर्सिंग कौन्सिलला विनंती केली व प्रथमच शून्य पर्सेंटाइल असलेल्या विद्यार्थ्यांनाही नर्सिंग महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे याहीवर्षी 10 जूनच्या सुमारास भारतीय नर्सिंग कौन्सिल कडे राज्य सीईटी कक्षाने पत्रव्यवहार केला आहे. तसंच यासंदर्भात नियमित पाठपुरावाही करण्यात येत आहे.

सध्या बीएससी नर्सिंगसाठी थेट प्रवेश मिळत नाही. विद्यार्थ्याने बारावी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण केल्यावर किमान भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र , आणि जीवशास्त्र या तिन्ही विषयांत किमान ४५% गुण मिळवणे गरजेचे आहे. त्यानंतर  ‘MH-BSc Nursing CET’ या सीईटी परीक्षेत किमान ५० पर्सेंटाइल या निकषावर प्रवेश  मिळतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या  (WHO) निकषानुसार, एक हजार लोकांच्या मागे तीन परिचारिका असणं महत्त्वाच आहे. महाराष्ट्रात परिचारिकांची संख्या गरजेपेक्षा अत्यंत कमी आहे. दरवर्षी ५५०० पेक्षा जास्त जागा रिक्त राहिल्यामुळे पुढील चार वर्षात महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेला मिळणाऱ्या सुमारे २२००० नोंदणीकृत परिचारिकांची गरज भासेल. 

नर्सिंग केवळ एक शैक्षणिक अभ्यासक्रम नसून तो क्लिनिकल प्रॅक्टिस वर आधारित व्यावसायिक कोर्स आहे. हॉस्पिटल मधल्या रुग्णांची २४ तास देखरेख करणे, त्याचप्रमाणे डॉक्टरी सल्ल्या नुसार उपचारांचे व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळणे हे परिचारिका प्रामुख्याने करतात. त्यामुळे या कोर्समध्ये कमी संख्या असणे हे राज्यातील रुग्णसेवेवर परिणाम करणारे ठरू शकेलं.

मागील शैक्षणिक वर्षात (२०२५-२६) महाराष्ट्रातील बीएससी नर्सिंग कोर्स चालवणारी एकूण २९४ महाविद्यालय होती. या सर्व महाविद्यालयांमध्ये मिळून १६५३० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी शासकीय संस्थांच्या १७ महाविद्यालयात एकूण ११७४ जाग्या भरल्या गेल्या होत्या, तर सहा जागा रिक्त राहिल्या. त्याचप्रमाणे खाजगी नर्सिंग मध्ये २७७  महाविद्यालयात ९७८३ जागा होत्या, तिथे ५५६७ जागा रिक्त राहिल्या. सरकारी महाविद्यालयात 99 % जागा भरल्या जातात, म्हणजेच विद्यार्थ्यांचा कल हा फीच्या तुलनेत सरकारी महाविद्यालयांकडे जास्त  प्राधान्य आहे अस दिसत. त्याऐवजी खाजगी महाविद्यालयांमध्ये 36 % हून अधिक जागा रिक्त असण्याचे प्रमुख कारण फी शुल्काचे  अधिक दर असण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्राने नर्सिंग क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा यासाठी मोठे प्रयत्न केलेले आहेत. त्यापैकी पूर्वी नर्सिंगचे प्रवेश ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या मार्कांवर आधारित असायचे. नीट ही परीक्षा डॉक्टर म्हणजे MBBS या कोर्स साठी असल्याने , शासनाने नर्सिंगसाठी स्वतंत्र ‘MH-BSc Nursing CET’ सुरू केली.  जेणेकरूनस्थानिक स्तरावर सुद्धा विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी मिळेल. नर्सिंग हे क्षेत्र महिलांसाठी राखीव किंवा योग्य मानलं जातं. शासकीय स्तरावर जीएनएम (GNM) मध्ये पुरुषांसाठी कोटा निश्चित केलेला असताना, आता बीएस्सी नर्सिंग पदवी अभ्यासक्रमातही पुरुष विद्यार्थ्यांचा टक्का गेल्या पाच वर्षात ३०% ते ४०% नी वाढला आहे, ज्याला शासन प्रोत्साहन देत आहे.

आज हॉस्पिटलमध्ये ‘क्रिटिकल केअर युनिट्स’ (ICU), ‘कार्डियाक कॅथ लॅब’ (Cath Lab), ‘इमर्जन्सी आणि ट्रॉमा केअर’ (Emergency & Trauma) आणि ‘ऑपरेशन थिएटर’ (OT) यामध्ये पुरुष नर्स यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आखाती देश (Gulf Countries), युनायटेड किंगडम (UK), कॅनडा आणि जर्मनी या देशांमध्ये  पुरुष आणि महिला परिचारिकांची संख्या आकर्षक पगारामुळे वाढते आहे.

अन्य लेख

संबंधित लेख