Tuesday, August 25, 2026

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती – उद्योगमंत्री उदय सामंत

Share

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी प्रलंबित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला अधिक गती देण्यासाठी सर्व औद्योगिक क्षेत्रांमधील प्रलंबित प्रश्न, भूसंपादन, पायाभूत सुविधांची कामे तसेच नवीन प्रकल्पांशी संबंधित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय शिरसाट, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, अमोल चव्हाण, अमोल महाडिक यांच्यासह संबंधित भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अंबलगन, जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.

‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश

जळगाव जिल्ह्यासाठी प्रस्तावित ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी तातडीने सादर करावा, असे निर्देश उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी दिले. या धोरणामुळे जिल्ह्यातील उद्योगांना विविध सवलती, प्रोत्साहन आणि औद्योगिक विकासासाठी आवश्यक पाठबळ मिळण्यास मदत होणार आहे.

चिचोली आणि कुसुंबा एमआयडीसीच्या विस्ताराला गती

चिचोली आणि कुसुंबा एमआयडीसीच्या विस्ताराची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. यासाठी सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया, जमिनीचे मूल्यांकन आणि दर निश्चितीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अन्य लेख

संबंधित लेख