Tuesday, November 24, 2026

अरुणाचलच्या ४० गावांत विकासाचे नवे पर्व अमित शहांच्या दौऱ्याचे फलित 

Share

केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी अरुणाचल प्रदेशचा तीन दिवसांचा महत्त्वपूर्ण दौरा केला. हा दौरा थेट भारताच्या सीमा असलेल्या भागात होता. अमित शहा यांनी  भारत चीन या सीमा भागात असलेले नागरिक यांच्याशी संवाद साधण्याचा, त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. या दौऱ्या दरम्यान त्यांनी इटानगर मधल्या  दोरजी खांडू राज्य संमेलन केंद्रात आयोजित केलेल्या सहकार क्षेत्रातल्या महोत्सवात भाग घेतला. त्याबरोबरच राज्यातील विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. अमित शहा यांनी सांगितलं की आदल्या दिवशी राज्यामध्ये राबवलेला व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम याचा सखोल आढावा घेतलेला आहे. त्यामधून अतिशय उत्साहवर्धक आणि महत्त्वाचे निष्कर्ष समोर आलेले आहेत.

ते पुढे म्हणाले अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरील ४० निवडक गावांमध्ये अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे अनेक नागरिक विविध संधी मिळण्यासाठी भारतातून चीनमध्ये वास्तव्यास गेलेले नागरिक पुन्हा भारतात परतले आहेत. त्याचप्रमाणे रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी विविध शहरात गेलेले लोक पुन्हा अरुणाचल प्रदेश मध्ये येऊन नवीन संधी तयार करत आहेत. एका बाजूला या ४० गावांमध्ये लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, तर गावामध्ये पुन्हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक चैतन्य निर्माण झालं आहे.

या दौऱ्यामध्ये अमित शहा यांनी मुख्यमंत्री पेमा खंडू, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण  रिजीजु, उपमुख्यमंत्री  चौना मीन, राज्याचे गृहमंत्री मामा नटुंग, कृषी मंत्री गॅब्रियल  डेनवांग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सुमारे साडेतीन ते चार तास महत्त्वाच्या बैठका घेऊन राज्याच्या विकास कामांवर चर्चा केली. स्वतः सीमेवर जाऊन स्थानिक लोकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला.

अमित शहा यांनी या दौऱ्यामध्ये अरुणाचल प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी रुपये ५,६१०.९५ कोटी किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले.

नोव्हेंबर २०२६ मध्ये जाहीर झालेले महाप्रकल्प
प्रकल्पाचे नावनिधीची तरतूद (रुपयांमध्ये)मुख्य उद्दिष्ट आणि प्रभाव
मुख्यमंत्री सर्वसमावेशक राज्य ग्रामीण रस्ते विकास कार्यक्रम₹२,००० कोटीदुर्गम आणि सीमावर्ती गावांना बारमाही पक्क्या रस्त्यांनी मुख्य प्रवाहाशी जोडणे.
मुख्यमंत्री सर्वसमावेशक राज्य ऊर्जा विकास कार्यक्रम₹२,००० कोटीराज्यातील प्रत्येक घरापर्यंत आणि सीमावर्ती भागांपर्यंत अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करणे.
मिशन शिक्षित अरुणाचल – टप्पा २₹१,५०० कोटीसीमावर्ती आणि ग्रामीण भागातील शाळांचे आधुनिकीकरण आणि दर्जेदार शिक्षणाची सोय.
व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम (VVP) अंतर्गत १९९ प्रकल्प₹११०.९५ कोटीराज्यातील ११ सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पायाभूत सुविधा, पर्यटन आणि उपजीविकेचे प्रकल्प राबवणे.
एकूण गुंतवणूक₹५,६१०.९५ कोटीअरुणाचल प्रदेशच्या पायाभूत, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणाचा महाआराखडा.

फेब्रुवारी २०२३ मध्ये केंद्राने मंजूर केलेल्या व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम याद्वारे अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि केंद्रशासित प्रदेश लडाख या उत्तरेकडील सीमा भागातील गावांचा सर्वांगीण विकास करणे हा उद्देश या योजनेच्या मुळाशी आहे. या उपक्रमांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने मोठे बदल घडवून आणले आहेत. भारत चीन सीमेवर उंच पर्वतीय भागात पूर्वीच्या सरकारच्या काळात जिथे पाऊलवाटा होत्या, तिथे पक्के रस्ते आणि पुलाचे बांधकाम केला आहे. यामुळे नागरिकांना बाजारपेठ, रुग्णालय आणि प्रशासकीय कार्यालय या ठिकाणी जाण्यासाठी सोयीच झाल आहे. त्याचप्रमाणे ४-जी मोबाईल नेटवर्क आणि ऑप्टिकल फायबर इंटरनेट पोहोचवल्यामुळे या गावांना डिजिटल इंडिया याद्वारे जोडल गेल आहे. या संपूर्ण भागात अनेक ठिकाणी वीज पोहोचवणं कठीण होत. त्या जागेवर सौर पॅनल आणि मायक्रो-ग्रिड बसवण्यात आले आहे. प्रतिकूल हवामानात सुद्धा स्थानिक स्तरावर प्रत्येकाच्या घरात प्रकाश आणि उष्णता पोहोचवण्याच काम सरकारने केल आहे. या भागात पाण्याच मोठा दुर्भिक्ष होतं. हर घर जल या योजनेमार्फत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. 

अरुणाचल प्रदेश मध्ये गेल्या बारा वर्षात सातत्याने धोरणात्मक गुंतवणूक जे केंद्र सरकारने केली आहे, त्याच आज सकारात्मक चित्र  उभ राहिल आहे. बारा वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेशाचा वार्षिक अर्थसंकल्प रुपये १२,००० कोटी इतका होता, तो आज  रुपये ३६,००० कोटींवर पोहोचला आहे. भारत- चीन सीमेवरील ११२६ किलोमीटरच्या पट्ट्यात चीनकडून सातत्याने सीमेवर पायाभूत सुविधा उभारण्याचे आणि स्वतःच्या बाजूला श्याओकांग (Xiaokang – सुबत्ता) गावे  वसवण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे भारतातील सीमा भागातील लोकांना चीन मधल्या गावांचे अप्रूप होते.  सहाजिकच या भागातील लोक चीनमध्ये मिळणाऱ्या संधी याविषयी उत्साही होते. परंतु भारताने जाणीवपूर्वक लक्ष देऊन महत्त्वाचे उपक्रम या पूर्ण सीमा भागात राबवले. म्हणजेच VVP अंतर्गत बांधले जाणारे रस्ते, पूल आणि हेलिपॅड हे नागरिकांच्या साठी  तर उपयुक्तच आहेत, परंतु भारतीय लष्कर आणि ITBP च्या वेगवान हालचालींसाठी याचा मोठा उपयोग झाला. 

स्वातंत्र्यानंतर अनेक दशकापर्यंत भारताच्या सीमा भागामध्ये, विशेषतः ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश सारख्या राज्यांबाबत भारत सरकारची उदासीनता पाहायला मिळत होती. भारत आणि चीन यांच्यात असलेले सुमारे १,१२६ किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा अरुणाचल प्रदेश मधून जाते. भौगोलिक दृष्ट्या  नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेला हा प्रदेश उंच पर्वतरांगा, घनदाट जंगल आणि प्रतिकूल हवामान असलेल्या या प्रदेशात नागरिकांना मूलभूत नागरिक सुविधांपासून अनेक दशक वंचित राहावं लागल आहे. २०१४ नंतर केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ईशान्य भारताच्या विकासासाठी ॲक्ट ईस्ट (Act East) या धोरणाला गती मिळाली. ज्या गावांमध्ये सूर्याची पहिली किरण पडतात आणि जिथून भारताच्या सार्वभौमत्वाची सुरुवात होते, त्या गावांना विकासाचा सर्वात प्रथम अधिकार मिळायला हवा ही भूमिका केंद्रीभूत ठेवून सरकारने विकासाचा वारू या संपूर्ण प्रदेशात नेला.

अन्य लेख

संबंधित लेख