Thursday, November 26, 2026

इंग्लंड प्रवास बंदीप्रकरणी सीजेपीचे सौरव दास दिल्ली उच्च न्यायालयात

Share

कॉकरोच जनता पार्टीचे सह-संयोजक आणि मुख्य प्रवक्ते सौरव दास यांना इंग्लंडला जाणाऱ्या विमानात रोखल्याचे प्रकरण हे पासपोर्ट कार्यालयाच्या नियोजित तपासणीच्या कारणास्तव केले गेलेले प्रकरण आहे. या संपूर्ण प्रकरणाला आता राजकीय वळण लागला आहे. सौरव दास हे सध्या अनेक उलट सुलट दावे करत उच्च न्यायालयात गेले आहेत.

गुरुवारी 26 नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती अमित महाजन यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारने याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आणली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल  चेतन शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले की, मुंबईत शिवाजी पार्क मधल्या आंदोलना दरम्यान  दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीवरून सौरव दास यांच्याविरुद्ध लूक आऊट सर्कुलर  जारी करण्यात आले आहे. याशिवाय, चेन्नईतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने  दास यांच्या पासपोर्टमधील जन्मस्थान, जन्मतारीख आणि वडिलांच्या नावातील गंभीर चुका असल्याकारणाने  त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली  आहे. 

 भारताच्या परराष्ट्र मंत्रालय  आणि केंद्र सरकारच्या वकिलांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने  २३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी म्हणजेच दास विमानतळावर पोहोचण्याच्या काही तास आधी त्यांना ईमेलद्वारे औपचारिक कारणे दाखवा नोटीस पाठवून पासपोर्ट न वापरण्याचा सल्ला दिला होता.

हे प्रकरण या वर्षी ऑक्टोबरच्या दिल्ली आणि मुंबई मधल्या आंदोलनादरम्यान सी जे पी नेत्यांना ताब्यात घेतलं त्यापासून सुरू झालेल आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्क आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढे 23 नोव्हेंबरला चेन्नईच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने दास यांना ई-मेलद्वारे कारणे दाखवा नोटेस पाठवून जन्मस्थान बाबतीत असलेली चूक निदर्शनास आणली आणि सात दिवसांसाठी पासपोर्ट न वापरण्यासाठी सांगितले. 24 नोव्हेंबर च्या पहाटे इंग्लंड साठी दास हे दिल्लीच्या विमानतळावर पोहोचले तेव्हा इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवासा साठी मनाई केली.

तेव्हा सौरव दास यांनी दिल्ली उच्च न्यायालय तातडीच्या सुनावणीसाठी याचिका दाखल केली. परंतु प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नितीन वासुदेव सांब्रे यांनी २५ नोव्हेंबर रोजी तात्काळ सुनावणीस नकार  दिला आणि पुढील सुनावणीसाठी 26 नोव्हेंबरची तारीख दिली. 

सौरव दास यांच्यावतीने अखिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, त्याप्रमाणे औपचारिक आदेश न देता नागरिकाला विमानतळावर रोखणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे असा युक्तिवाद त्यांनी समोर ठेवला. यावेळी परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) चेतन शर्मा यांनी काही प्राथमिक आक्षेप नोंदविले. त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारकडून दिलेल्या नोटीसला उत्तर देण्याऐवजी दास यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेणे सोयीचं मानलं. पासपोर्ट चौकशी ही नियोजित पडताळणी असल्याकारणाने यामधील चुका यांचं निवारण महत्त्वाचा आहे. सौरव दास यांनी या प्रकरणांमध्ये मूळ कागदपत्र सादर केली असता पासपोर्ट विभागाला ही चूक सुधारण शक्य  झालं असतं. त्याचप्रमाणे मुंबई मधल्या कार्यक्रमात आंदोलन प्रकरणी दाखल झालेला गुन्हा यासाठी पूर्व सूचना दिल्याचे सुद्धा त्यांनी नमूद केले.

या विषयावर सौरभ दास यांनी सोशल मीडियावर उलट सुलट दावे केले आहे. त्यावर दिल्ली भाजपने ताशेरे ओढले आहेत. दास हे परदेशात स्वतःच्या खर्चाने कोणत्यातरी खाजगी कार्यक्रमासाठी जात आहेत. त्यांनी केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सगळं कुभांड रचल आहे. हा सोशल मीडियावर केलेला एक स्टंट आहे या व्यतिरिक्त काही नाही असा भाजपच्या वतीने आलेला दावा आहे.

अन्य लेख

संबंधित लेख