Thursday, November 28, 2024

Pune Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लवकरच सुरू होणार या ठिकाणच्या मेट्रो सेवा

Share

पुणे : पुण्यात लवकरच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट अशी पुणे मेट्रो (Pune Metro) ची भूमिगत रेल्वे सेवा सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. ऑगस्ट अखेर मेट्रो सेवेचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा मार्ग 3.64 किलोमीटरचा असून सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गावर बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी तीन स्थानके असणार आहेत.

पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले की भूमिगत मेट्रो (Metro) सेवेच्या दोन मार्गावरील ट्रायल रन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत, ते पुढे म्हणाले की काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा टीम ऑपरेशन सुरू करण्यास संमती देण्यासाठी भेट देईल.

सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट पर्यंत कामकाज सुरू करण्याची तारीख ३१ मार्च होती. मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमुळे ती वाढवण्यात आली आहे. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना लागणारा वेळ वाचेल व पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नक्कीच मदत होईल यात शंका नाही. पुणेकरांसाठी हि आनंदाची बाब असून सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट प्रवासाची उत्सुकता पुणेकरांना लागलेली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख