Saturday, October 19, 2024

संवाद यात्रेच्या माध्यमांतून भाजप राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार

Share

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीचे (BJP) सर्व पदाधिकारी १९ नेत्यांच्या नेतृत्त्वातील संवाद यात्रेच्या (Samvad Yatra) माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी दिली. बावनकुळे हे कोराडी (नागपूर) येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. येत्या २१ जुलै रोजी पुणे (पुणे) येथे महाराष्ट्रातील पाच हजार भाजपा पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार असून त्यात भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी, यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेविषयी अंतिम रूपरेषा तसेच तारीख पक्की ठरणार आहे.

बावनकुळे म्हणाले कि, महाराष्ट्रातील भाजपाचे १९ वरिष्ठ नेते संवाद यात्रेत सहभागी होतील. ही यात्रा सर्व ४८ लोकसभा, २८८ विधानसभा तसेच जिल्हा परिषद व पचायत समिती गट आणि नगर पालिका क्षेत्रात पोहचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये घोषित केलेली कामे व महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कामाची माहिती, सरकारने घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहचविणार आहोत. समाजातील सर्व घटकांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या संवाद यात्रेचा समारोप विधानसभानिहाय होणार आहे.

21 जुलैच्या पुणे अधिवेशनापूर्वी 19 तारखेला मुंबईत संघटनात्मक बैठक होणार असून महाराष्ट्र विधानसभा पक्ष प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव ही बैठक घेणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख