महायुती सरकारने योजनांचा धडाका लावला आहे समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी महायुती सरकारने विविध योजनांची घोषणा केली आहे त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यामध्ये पात्र महिलेस रुपये दीड हजार प्रतिमा मिळणार आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा योजना यामध्ये पात्र कुटुंबाला वर्षाला तीन एलपीजी गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना या योजनेअंतर्गत तरुणांना दरमहा विद्या वेतन दिले जाणार आहे . महायुते सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आणली आहे या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार आहे.
कृषी पंप वीज बिलाची थकबाकी वसुली हे महावितरणपुढे नेहमीच आव्हान राहिले आहे. वीज थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडली असता राजकीय विरोध होतो. त्यामुळे कृषी वीज बिलाची थकबाकी 50 हजार कोटी रुपयांवर गेली आहे.त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महायुती सरकारने हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे
राज्यातील शेतकऱ्यांना वीज मोफत मिळणार आहे. 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंप असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना एप्रिल 2024 पासून मार्च 2029 पर्यंत लागू राहणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ही योजना जाहीर केली आहे . राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
मोफत वीज योजनेचा तीन वर्षांनंतर आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पुढे दोन वर्ष योजना राबवाण्याबाबत निर्णय होईल. शासनाच्या या योजनेचा फायदा शेतकऱ्यांप्रमाणे महावितरणला होणार आहे. महावितरणची कृषी पंपांच्या वीज बिलाची वसुलीची चिंता मिटणार आहे. महावितरणला राज्य सरकार वीज बिलापोटीचे 14 हजार 760 कोटी रुपये देणार आहे.