Thursday, October 24, 2024

बदलापूर अत्याचार प्रकरणावर समितीचा प्राथमिक अहवाल सादर

Share

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीला आल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी असंतोष व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यास हलगर्जी करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय, शाळेनेही या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना निलंबित केले आहे.

या प्रकरणी शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर झाला आहे. या अहवालातली निरीक्षणं तपास यंत्रणांना सादर करण्यात येणार असून शिक्षण विभागाअंतर्गत स्वतंत्र हेल्पलाईन अर्थात मदतवाहिनी सुरू करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. दोषी ठरलेल्यांना पाठीशी घातलं जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी मोबाईलवर पॅनिक बटन देता येईल, यासाठी महिला आणि बालविकास तसंच गृहविभागामार्फत निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व शाळांमध्येही असं बटण देता येईल, यासाठी निर्णय घेतला जाईल, असं केसरकर यांनी सांगितलं.

अन्य लेख

संबंधित लेख